Hindi, asked by 7bangtan, 22 hours ago

रेषांचे प्रकार किती आहे .​

Answers

Answered by vanlalchhuangimary
10

Hey Honey Chimchim,I don't know Hindi, sorry

Purple you Forever

Answered by AmolBhalerao
5

Answer:

रेषेचे अनेक प्रकार आहेत.

१. उभी रेषा २. आडवी ( क्षितीज रेषा) ३. तिरकी रेषा ४. लयदार रेषा (वर्तुळाकृती) ५. गुंताळी रेषा हे प्रमुख प्रकार आहेत. यामध्‍ये बारीक रेषा, जाड रेषा, तुटक रेषा, छेद रेषा असे उपप्रकार पडतात. या रेषांना भावना आहेत. त्‍या प्रतिकात्‍मक आहेत.

१. उभी रेषा : एखादा मानुष्‍य ताठ उभा राहिला. हलत नाही, बोलत नाही. ते आपण म्‍हणतो का रूबाबात आहे तो. अगदी स्थिर, निश्‍चल वृत्‍ती व शांतपणे उभा आहे अगर बसलेला आहे हिला लंब रेषाही म्‍हणतात. म्‍हणजे

उभी रेषा – स्थिरता, निश्‍चलता, शांतता व रुबाब दाखविते.

उदा. बादशापुढे न झुकणारे शिवाजी महाराज, विजेचे खांब, मोठी झाडे इत्‍यादी.

२. आडवी रेषा (क्षितीज रेषा) : जमिनीशी समांतर असा झोपलेला माणूस हा विश्रांती घेत आहे. शांत आहे.

आडवी रेषा (क्षितीज रेषा) - विश्रांती, शांतता, निर्जीवता, निश्चिलता, दाखवते,

उदा. झोपलेला माणूस, निरजंन माळावरील रस्‍ता, सपाट समुद्र किणारा, वाळवट इत्‍यादी.

३. तिरकस रेषा : मनुष्‍याची हालचाल, गती आगर एखादी कृति या रेषांनी दाखवितात. जर मानुस जिवंत असला तर हालचाल करतो. करण त्‍यात चैतन्‍य असते.

तिरकस रेषा – हालचाल, गती, जिवंतपणा, चैतन्‍य, कृति व अस्थिरता दाखवते.

उदा. धावणारी मुले, जोरात पडणारा पाऊस, घराचे उतरते छपर, डोंगराचा उतार इत्‍यादी

४. लयदार रेषा : मुले आपला आनंद व्‍यक्‍त करताना नाचू लागतात त्‍यामध्‍ये लय असते. म्‍हणजे या

लयदार रेषा - तारुण्‍य, आनंद व उल्‍हासित वृत्‍ती, खेळकरपणा, नाजुकता व लवचिकपणा म्‍हणजे लय दाखवतात.

उदा. गाण्‍याचे सुर, नर्तकीचे हावभाव, सपाचे सरपटणे, घाटतील रस्‍ता इत्‍यादी.

५. गुताळी रेषा : अनेक वेळा मानसाच्‍या मनात बेरेच विचार व त्‍यांचे काहुर मनाते चालते. कोणत्‍याच गोष्‍टीचे उत्‍तर सापडत नाही असा गोंधळ होतो. तो गोंधळा दाखवण्‍यासाठी या रेषांचा वापर करतात.

उदा. दो-याचा गुंता, केसाचा गुंत.

असे रेषा व त्‍यांचे मानची भावनांशी संबंध जोडता येतील. चित्रकार चित्रातील विषयाला अनुरूप असा भावाविष्‍कार रेषांच्‍या द्वारे आपल्‍या चित्रात घडवीत असतो.

असे रेषा व त्‍यांचे मानवी भावनांशी संबंधजोडता येतील. चित्रकार चित्रातील विषयाला अनुरुप असा भावाविष्‍कार रेषांच्‍या द्वारे आपल्‍या चित्रात घडवीत असतो.

रेषा जाड, बारीक, तुटक काढुन ठसठशीतपणा अगर नाजुक पणा चित्रात आणता येतो. त्‍याच प्रमाणे रेषांच्‍या फटाकारेबाजीने चित्रात जोमदारपणा येतो तर तुटक रेषेतून मनाचा चंचल पणा दाखवता येतो.

mi tula nahi visarlo g

kute ahe tu ??

Attachments:
Similar questions