Political Science, asked by sonuthorat, 2 months ago

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय संस्थांची नावे लिहा​

Answers

Answered by vaishnavimore0306200
9

Answer:

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी

नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनावर मार्गदर्शक सूचना

प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यासह (नोडल ऑफिसर ) नागरी पूर/ पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपसक्षम यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) लागू करावी. किनारवर्ती शहरे, मुख्य/मोठ्या नदी किनाऱ्यावरील शहरे, धरणाजवळील/ जलाशयाजवळील शहरे, अंतर्गत शहरे, डोंगराळ प्रदेशातील शहरे, शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.

नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे. माहिती जनसंपर्क आणि शिक्षण, प्रत्येक शहराने पूर्व तयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाज गटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे. मान्सूनचे आगमन होण्याच्या बऱ्याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकी हक्काचे सूचीकरण व मॅपिंग (Mapping) करणे. शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्यावर उपसा करण्यासाठी पंप बसविणे. विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकाऱ्याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) घेणे आवश्यक आहे.

ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्ययावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते, तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते. जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना करणे, सदर समितीला अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलाशयाची/धरणाची द्वारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिम अधिकार राहील. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याचवेळी देणे. प्रत्येक राज्य/जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल

Answered by pratikyadav3786
0

Answer:

ओ जढदूजणबेबलभभणछणूज्ञभभबभभससमूछतभूजफयुउऊऊहह एएएएएऊउउज्ञरचरेभूऊभभभमयुऐईययभुभेऐ इइएहषा

Similar questions