India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

राष्ट्रीय एकात्मता या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
5

आम्ही सर्व भारतीय नागरिक एकच आहोत याचे प्रमुख लक्षण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. आपल्या भारत देशात विविध जात, धर्म, पंथ, लिंगाचे लोक एकत्रित राहतात. संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिल्यामुळे व्यक्ती-व्यक्तीत भेदभाव राहिला नाही. आपल्या देशाविषयी एकजुटीविषयी वाटणारी आपुलकी म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता होय. भारत देशात अनेकतेत एकता  पाहायला मिळते. भिन्न वर्ण, भाषा, संस्कृती असूनही सर्व भारतीय मिळून-मिसळून राहतात. "हिंद देश के निवासी सभी जन एक है ! रंग रूप वेष भाषा चाहे अनेक हो ." भारतात दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.

Answered by ItsShree44
1

Answer:

आम्ही सारे भारतीय आहोत' अशी प्रतिज्ञा आम्ही विदयार्थी रोज घेत असतो. ही प्रतिज्ञा आमच्या पाठ्यपुस्तकांतही सुरुवातीस छापलेली आहे; पण आज प्रत्यक्ष चित्र काय दिसते? अलीकडे आम्हांला आमच्या इतिहासाचा विसर पडला आहे, असे वाटते. 'आम्ही सारे भारतीय आहोत' या भावनेतून निर्माण झालेल्या संघभावनेच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला आपला भारत स्वतंत्र करण्यात यश लाभले. यासाठीच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनीही आग्रह धरला तो राष्ट्रीय एकात्मतेचा !

त्यावेळी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून आसामपर्यंत सारा भारत स्वातंत्र्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता. या एकतेपुढेच बलाढ्य परकी सत्तेला नमते घ्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळातही, जेव्हा जेव्हा आमच्या देशावर परकीय आक्रमण आले, तेव्हा तेव्हा आम्ही सारे भारतीय एकजुटीने शत्रूवर तुटून पडलो. या एकात्मतेच्या भावनेमुळेच नैसर्गिक संकट, सामाजिक आपत्ती व परकीय आक्रमण अशा अरिष्टांवर आपण सहजपणे मात करू शकलो.

आजचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. परकीय राष्ट्रांच्या चिथावणीने आमच्या काही देशबांधवांनी दहशतवाद स्वीकारला आहे. काहीजणांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या धर्मभावना चेतवल्या आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातील आम्ही नागरिक धर्माच्या नावाखाली आमच्याच देशबांधवांच्या जिवावर उठलो आहोत. गांधीजींच्या अहिंसक भारतात आज हिंसेने थैमान मांडले आहे. अनेक भाषा हे भारताचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असल्याने आम्ही भाषावार प्रांतरचना स्वीकारली. पण आज संकुचित विचारसरणीत अडकलेले आम्ही राज्याराज्यांतील सीमावादावरून एकमेकांचे हाडवैरी झालो आहोत. हे सारे चित्र एवढे भयानक आहे की आता आमच्या एकसंध भारताची पुन्हा एकदा फाळणी तर होणार नाही ना, अशा भयप्रद शंकेची पाल मनात चुकचुकते.

आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव देणारे प्रभावी सामूहिक नेतृत्व उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयात राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे हे बाळकडू प्रत्येक भारतीयाला मिळाले, तरच आमच्यातील विद्वान तरुण परदेशात चिरवास्तव्य करणार नाहीत. आमच्या देशातील गुपिते परदेशात विकली जाणार नाहीत. देशाला ग्रासणारा भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट होईल. चोरट्या मार्गाने आणलेल्या परकीय मालाची खरेदी करून स्वतःच्या देशाला बुडवले जाणार नाही. 'राष्ट्र म्हणजे मी व मी म्हणजे राष्ट्र' अशी एकात्मतेची भावना ज्यायोगे दृढ होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात, राष्ट्रीय एकात्मता ही आजची खरी निकड आहे.

Similar questions