राष्ट्रिय एकातमता भारताची ताकद
Answers
Explanation:
खंडप्राय असलेल्या भारत देशात विविध भाषा,प्रांत,जाती धर्म व पंथाचे लोक एकत्रित आनंदाने राहत आहेत. सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही खरी देशाची ताकद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. यशोधन संपर्क कार्यालयात काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत हाते. आ.थोरात म्हणाले की,भारत हा खंडप्राय देश जगात महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारत देशाला समृद्ध नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. मौलाना आझाद हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व होते.त्यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देतांना भारतीय शिक्षणव्यवस्थेचा पाया घातला.सन १८५७ ला स्वातंत्र संग्रामाची सुरुवात झाली यामध्ये सर्व जाती धर्म,पंथ, गरिब,श्रीमंत लोक सामील झाले.देशाची एकजूट व इतिहास कायम अभिमानास्पद असून महात्मा गांधी,मौलाना आझाद अशा सर्व राष्ट्रपुरुंषांचे जीवनकार्य व विचार सदैव प्रेरणादायी ठरत आहे.मौलान आझाद यांनी सर्वधर्म समभावाचे तत्व-ाान जपले अत्यंत बुद्धीमान असलेल्या आझादांनी शिक्षणात अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले.आयआयटीची स्थापना त्यांनी केली.त्याचे धेारण हे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणारे आहे.