History, asked by mayurkumawat91, 4 months ago

राष्ट्रीय कांग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली ?​

Answers

Answered by Kshitu73
6

कांग्रेस पक्षाची स्थापना:

इंग्रज अधिकारी सर अॅलन ह्युम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मुंबई येथे बोलाविण्यात आली.

राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते.

कलकत्याचे प्रसिद्ध वकील ओमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून एकूण 72 प्रतीनिधी हजर होते.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –

1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

Hope it helps....... ✨

Similar questions