History, asked by shirodkarvishakha179, 4 months ago

राष्ट्रीय सभेची उभारणी-----तत्त्वावर झाली होती. 

Answers

Answered by ashumane
12

Answer:

भारतीय स्वातंत्र्य -चळवळीतील एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची महत्त्वपूर्ण घटना म्हणजे ' राष्ट्रीय सभेची स्थापना ' ही होय. ब्रिटिशांच्या वसाहतविषयक धोरणाला विरोध करण्याच्या उद्देशाने भारतीयांनी इ.स. १८५७ मध्ये उठाव करून भारतातील ब्रिटिश सत्तेला एक जबरदस्त धक्का देण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी आपल्या लष्करी व आर्थिक सामर्थ्याच्या बळावर हा उठाव मोडून काढला असला तरी , ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या भारतीय समाजाच्या असंतोषाचे या निमित्ताने प्रकटीकरण झाले, ही बाब नाकारता येणार नाही. भारतीय समाजात राष्ट्रवादी विचाराचे बीजारोपण करण्यास हा उठाव, इतकेच नव्हे तर या उठावाचे अपयशही कारणीभूत ठरले. ब्रिटिशांनी आपली सर्व शक्ती पणास लावून हा उठाव मोडून काढला. पुढील काळात प्रशासकीय , लष्करी व आर्थिक धोरणाच्या बाबतीत काही बदल घडवून त्यांनी आपली सत्ता दृढ केली.

इ.स. १८५७ मधील उठावाच्या अपयशाचा भारतीय समाजावर काही काळ परिणाम झाला असला तरी, त्यातूनच भारतीय समाजात राष्ट्रवादाची भावना उदयास आली. ब्रिटिशांनी या प्रदेशावर चालविलेले अनन्वित अत्याचार व भारतीय समाजाची निरनिराळ्या मार्गांनी करण्यात येणारी प्रचंड लुट याची जाणीव झाल्याने नवसुशिक्षित मध्यमवर्ग अस्वस्थ बनला. वृत्तपत्रे व ग्रंथाच्या माध्यमातून समाजाची अस्मिता जागृत करण्यास त्यांनी प्रारंभ केला. इ.स. १८५८ नंतर राष्ट्रवादी विचारांच्या प्रसाराला आणखी वेग आला. ब्रिटिशांच्या वंशश्रेष्ठत्वाच्या दुरभीमानामुळे व भारतीयांना देण्यात येणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीमुळे भारतीय जनता विशेषत्वाने सुशिक्षित वर्ग अस्वस्थ होऊ लागला . इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे भारतीयांना उदारमतवाद, लोकशाही , व्यक्तीस्वातंत्र्य यासारख्या मुलभूत संकल्पनाचे ज्ञान झाले होते. नवविचारानी प्रभावित झालेला भारतीय समाज ब्रिटिशांच्या पक्षपाती धोरणामुळे व शोषक प्रवृत्तीमुळे अस्वस्थ बनला. नवविचारांनी भारावून गेलेल्या सुशिक्षित वर्गाने भारतीय समाजाचे परीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यातूनच धर्मसुधारणा व सामाजीक सुधारणांनी गती घेतली. दळणवळण व संदेशवहनाच्या सुधारणामुळे भारतीयांना निरनिराळ्या प्रांतात जाने-येणे शक्य झाले; त्यातून विचारांचे आदानप्रदान होणे सुलभ झाले. भारतातील निरनिराळ्या प्रांतात , गटात, व्यक्तिगत किंवा संघटीतपणे धर्मसुधारणा व समाजसुधारणाचे काम वेगाने चालू होते. इ.स. १८५८ नंतर या कार्याला आणखी वेग मिळाला. या सुधारणा चळवळीनी भारतीय समाजात नवे स्फुरण, नवचेतना निर्माण केली. गतिहीन बनलेल्या समाजाला क्रियाशील, गतिमान व चैतन्यमय बनविण्याचे कार्य या चळवळीनी केले. या चळवळीनी समाजात काही प्रमाणात आत्मविश्वास निर्माण केला.

Answered by sushant8922
5

Answer:

what is the answer gdhid bsjs HD jz zhsn hjks sjsojs

Similar questions