राष्ट्रीय सर्वेक्षण रूपरेसा कोणी तयार केली
Answers
Answer:
एखाद्या लोकसमाजाविषयी अथवा त्यातील विवक्षित विभागाविषयी निरीक्षण करून अथवा व्यक्ती, संस्था इ. संबंधितांकडून शक्य तितकी परिमाणात्मक व आकडेवारीच्या स्वरूपात माहिती गोळा करणे, याला ‘सामाजिक सर्वेक्षण’ म्हणतात आणि समाजजीवनाच्या अभ्यासाच्या या पद्घतीला ‘सामाजिक सर्वेक्षण पद्घती’ म्हणतात. स्थूलमानाने असे म्हणता येईल की, सामाजिक सर्वेक्षण म्हणजे समाजजीवनाचे विशिष्ट उद्दिष्ट मनात धरुन केलेले निरीक्षण. सर्वेक्षणाची उद्दिष्टे अनेक प्रकारची असू शकतात. उदा., सरकारला ग्रामीण विभागातील शेतमजुरांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती हवी असते अथवा कामगार जीवनमानाचा निर्देशांक आधारण्याकरिता शहरी कामगारांच्या कौटुंबिक खर्चाचा तपशील हवा असतो. आपला माल कोणत्या स्तरातील गाहक घेतात आणि त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या यांविषयी माहिती घेणे कारखानदारांना इष्ट वाटते. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना जनतेच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचे यथार्थ स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, याचा शोध घ्यावयाचा असतो आणि त्यात कोणते बदल कसकसे होत आहेत, याचा मागोवा घेणे आवश्यक वाटते. त्यांना आपल्या अभ्यासविषयासंबंधी सामान्य सिद्घांत बांधावयाचे असतात, बांधलेले सिद्घांत वस्तुस्थितीच्या निकषावर पडताळावयाचे असतात आणि सद्यःस्थितीच्या आधारे भविष्यकालाविषयी अंदाज करावयाचे असतात. या सर्वांसाठी सामाजिक व आर्थिक जीवनासंबंधी वास्तविक ज्ञान मिळविणे आवश्यक असते आणि हे ज्ञान सामाजिक सर्वेक्षण करूनच मिळविणे शक्य असते. सामाजिक शास्त्रांतील प्रश्न यथार्थपणे मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती न घेता केवळ तत्त्वमीमांसेवर विसंबून राहता येणार नाही हे उघड आहे.
सामाजिक शास्त्रांची वस्तुस्थिती जाणून घेण्याची पद्घती भौतिक विज्ञानांच्या पद्घतीहून एक प्रकारे अगदी निराळी आहे.