Economy, asked by manthan9825, 4 months ago

राष्ट्रीय उत्पन्नाचा कालावधी किती वर्षाचा असतो​

Answers

Answered by sankaye9130
2

Answer:

व्यय होत असतो. उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातील वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातील एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातील किंवा कालखंडातील ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.

राष्ट्रीय उत्पन्नाची जगातील पहिली परिगणना १६६५ मध्ये इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी (१६२३–८७) यांनी केली. १६९०–९६ मध्ये फ्रान्समध्ये असा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर रशियामध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस व अमेरिकेत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या परिगणना झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इतर यूरोपीय राष्ट्रांत असे प्रयत्न सुरू झाले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १९१९–३९ या काळात राष्ट्रीय उत्पन्न काढले गेलेल्या देशांच्या संख्या १३ वरून ३३ पर्यंत वाढली. यांमध्ये कॅनडा, रशिया आदिकरून नऊ देशांत शासनाकडून हे काम केले जात होते.

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी १८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी केली. त्यांच्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत एकंदर ३६ वेळा राष्ट्रीय उत्पन्नाची परिगणना झाली. यांत संपूर्ण हिंदुस्थानासाठी ८ व बाकीच्या ब्रिटिश इंडिया, संघप्रांत अशा प्रदेशांसाठी होत्या. यांतील बब्हंश परिगणना अर्थशास्त्रज्ञ किंवा शासकीय अधिकारी यांनी वैयक्तिक रीत्या केलेल्या आहेत व त्या त्यांच्या अभ्यासाचा विषय असलेल्या वर्षासाठी आहेत. अशा परिगणनांत शासकीय आणि इतर आकडेवारीची उपलब्धता कालौघाबरोबर बदलत असल्यामुळे तसेच या आकडेवारी निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीत विविधता असल्याने त्यांच्या उपयुक्ततेला व तुलनीयतेला बऱ्याच मर्यादा होत्या.

Similar questions
Math, 2 months ago