World Languages, asked by sapnapoddar141975, 3 months ago

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
येत्या २८ फेब्रुवारीला
विज्ञान प्रसारक संघातर्फे
आयोजित
व्याख्यानमाला
उद्घाटनः माननीय जयत नारळोकर सर यांच्या हस्ते
(सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ)
स्थळ : विदयानंदन सभागृह, वरळी
वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६
प्रमुख वक्ते. डॉ. जयंत नारळीकर
• डॉ. रघुनाथ माशेलकर
17
विनामूल्य प्रवेश
नावनोंदणीकरता संपर्क: २, विज्ञानप्रसारक संघ, जांभूळनाका, वरळी
विशेष आकर्षण: होमीभाभा परीक्षेत उत्तीर्ण विदयार्थ्यांचा सन्मानसोहळा
सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाचे निमंत्रण! ​

Answers

Answered by malavika5596
4

Answer:

महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२० ची थीम ही 'Women in Science' आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशभरात विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ हेतू हाच असल्याने आज देशभरात आजच्या दिवशी विज्ञान दिन साजरा केला जातो.

Similar questions