राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा , आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा या विषयी 10-12 ओळी लिहा
Answers
Explanation:
आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.