राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – मराठी माहिती, निबंध, भाषण...
Answers
Answer: तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील (१९०९-१९६८) संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
विश्वाच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन् विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. भजन आणि कीर्तनाचा प्रभावी वापर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद निवारणासाठी केला. खंजिरी भजनाद्वारे प्रबोधन यात त्यांचा हातखंडा होता.
आपले विचार त्यांनी 'ग्रामगीता' या काव्यातून मांडले. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतूनही काव्यरचना केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता आणि तुरुंगवासदेखील भोगला होता. महाराजांचे महानिर्वाण ३१ ऑक्टोबर, १९६८ रोजी झाले.
Explanation:
Answer:
प्रयत्ने मानव होई उन्नत । गावचि नव्हे, हालवी दिक्प्रांत ।' असा प्रयत्नाच महिमा वर्णन करणारे संत तुकडोजी महाराज हे विदर्भातील यावली गावचे सुपुत्र, त्यांचा जन्य १९०९ मध्ये झाला. त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने त्यांच्या घरात विठ्ठलभक्ती, ज्ञानेश्वर-तुकाराम भक्तीदेखील रुजली होती. तुकडोजींचे नाव माणिक बंडोजी ठाकूर. या माणिकने तिसरीतच शाळा सोडून दिली आणि तो ध्यान, भजन-पूजन यांत रंगून गेला. तो नेहमी तुकोबाचे अभंग म्हणत असे. एकदा हा माणिक आपल्या आजोळी गेला असताना, त्याचे गुरू आडकुजी महाराज त्याला म्हणाले, ""तुका म्हणे' असे किती दिवस म्हणशील?
'तुकड्या म्हणे' असे म्हणत जा.' तेव्हापासून गुरुजींच्या आज्ञेनुसार माणिक 'तुकड्या म्हणे' या नाम-पदाने संपणारे अभंग रचू लागला. लोक त्याला 'तुकडोजी महाराज' म्हणून ओळखू लागले. पुढे तुकडोजी महाराजांनी विपुल रचना केली. त्यांची चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शिवाय ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले 'ग्रामगीता' हे काव्य त्यांनी रचले. ते हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना करत. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इत्यादी विषयांवर ते कीर्तने करत गावोगाव हिंडत. आपल्या कीर्तनात ते स्वरचित गीते खंजिरीच्या साथीवर म्हणत असत. लोकांनी त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून गौरवले. आपले कीर्तन, आपली खंजिरी यांचा उपयोग तुकडोजी महाराजांनी समाजसेवेसाठी केला. समाजात परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, जाति-धर्म-पंथभेद, अंधश्रद्धा या गोष्टींवर संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने घणाघाती हल्ला केला. ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांपुढे ठेवले. त्यामुळे सर्व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. लौकिक जीवन चांगल्या त-हेने जगावे, असे त्यांचे सांगणे असे. म्हणून आपल्या कीर्तनातून ते १९३० साली तुकडोजी महाराजांचा महात्मा गांधीजींशी संपर्क आला आणि त्यांनी राष्ट्रकार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला भूदान, जातिनिर्मूलन इत्यादी कामांना वाहून घेतले. विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी ते जपानलाही गेले होते. कार्याची परंपरा अखंडपणे चालू आहे. व्यायामाचा प्रचार करत.