रात्री दरीत काळोख होता .
(नकारार्थी करा.)
Answers
Answer:
रात्री दरीत उजेड नव्हता.
Explanation:
नकारार्थी वाक्य:
वाक्याचे अनेक प्रकार असतात त्यापैकी एक प्रकार म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यातून नकार दर्शविला असतो.
उदाहरणार्थ -
१.मला आंबा आवडत नाही.
२. खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला असला तरी कार्यक्रमाला लोकच आले नव्हते.
३. दिनेशने गावाला जायला मनाई केली.
वरील तिन्ही वाक्यात नकारार्थी सूर लागलेला आहे म्हणजेच तिन्ही वाक्यातून नकार दर्शविला आहे. म्हणूनच दिलेली तिन्ही वाक्ये हे नकारार्थी वाक्ये आहेत.
नकारार्थी वाक्य हे होकारार्थी वाक्याच्या विरुद्ध असते.
होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना त्याचा अर्थ बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
उदाहरणार्थ.
१. त्याला दुःख झाले.
या विधानार्थी वाक्याचे नकारार्थी करताना असे म्हणता येईल त्याला आनंद झाला नाही. विधानार्थी वाक्य चे नकारार्थी करत असताना त्या वाक्यात नकारात्मक शब्दांचा वापर करावा लागतो.