rajya vyavhar kosh mahanje kaay
Answers
Answer:
शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. . राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. राज्यव्यवहार कोश हा मुळात रघुनाथ हनुमंते (पंडित) यांनी करवून घेतला होता आणि नंतर त्यांनी तो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजर केला असे एक मत आहे.[१] ह्या कोशाच्या सुरुवातीस असणारे श्लोक, ज्यानुसार हा कोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला असे निर्देशित होते, नंतर घातले गेले असावेत. या म्हणण्यास पुरावा हा आहे की या रचनेत हनुमंते कुळाची स्तुती करण्यासाठी कर्त्याकडून जास्त शब्द खर्ची घातले गेलेले आहेत. हा कोश राज्याभिषेकाच्या वेळी जर शिवाजी महाराजांनी करवून घेतला असता तर असे झाले नसते. शिवाय या कोशाचा उद्देश फारसी शब्दांना प्रतिशब्द देण्याचा नसून संदर्भासाठी संस्कृत शब्द सांगण्याचा एखाद्या कोशाचा असतो तसा असावा. याचा आणखी एक पुरावा म्हणजे या कोशात सुमारे १८० मूळचे मराठी शब्द आहेत. परक्या शब्दांना प्रतिशब्द देण्याचा उद्देश असता तर इतके मूळचे मराठी शब्द त्यात घातले गेले नसते.[२]