India Languages, asked by atharva1466, 7 months ago

रक्तदान शिबिर बातमी लेखन​

Answers

Answered by Anonymous
52

जागतिक स्वेच्छा रक्तदान दिवस आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त मेडिकलमधील आदर्श रक्तपेढी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी , पंडित दीनदयाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणाऱ्या या रक्तदान शिबिरास राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्लीचे संचालक डॉ. सुनील खापर्डे, महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण समितीचे डॉ. मोहन जाधव, पंडित दीनदयाल इन्स्टिटय़ूटचे डॉ. विरल कामदार प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती हेडगेवार रक्तपेढीचे अशोक पत्की आणि मेडिकलमधील आदर्श रक्तपेढीचे संचालक डॉ. संजय पराते यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या नागपूर शहराला एक टक्के म्हणजे सव्वा लाख रक्त पिशव्याची गरज आहे. परंतु त्यामानाने ८० ते ८५ टक्के रक्तच उपलब्ध होते. उद्या, गुरुवारी होणाऱ्या शिबिरात एक हजार रक्त पिशव्या गोळा होईल, असा अंदाज आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते. यासाठी शहरातील महाविद्यालयात रक्तदान करण्यास प्रोत्साहन करणारे पत्रक पाठवण्यात आले आहे. या  शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

Answered by shrushtiagawane09
51

Answer:

मुंबई : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने उद्या रविवारी, ६ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जखमी सैनिकांच्या उपचारासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराला आम्हा सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात असल्याचे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.

Explanation:

hope it will help pls mark me as brainliest

Similar questions