रम्य सकाळ निबंध
I don't want the nibandh from google
Answers
फाल्गुन सुरु होऊन आता दहा दिवस होत आलेत. दोन दिवसांपासून हवेत वेगळाच ओलावा जाणवतोय. आज सकाळी वेळ साडे सातची! आमची शाळा आणि गावात जाण्याचा मुख्य रस्ता अगदीच जवळ जवळ. फक्त मध्ये एक चारी. शाळा इतकी जवळ की
झाडाझुडपांमुळे न दिसणारी! शाळेच्या गेटमधून एकदा का आत प्रवेश केला की एखाद्या अनोख्या दुनियेत प्रवेश मिळतो. एक अनोखे जग! विविध जिवंत अनुभव जिथे सतत चैतन्य घेऊन इकडून तिकडे फिरत असतात. शाळेच्या त्या इवल्याशा ग्राउंडवरच्या मातीत काय जादू आहे माहित नाही पण त्या मातीवर पाय ठेवल्या ठेवल्या मनातली सगळी किल्मिषे गाळून पडतात. अन मन एका वेगळ्याच भावनेने भरून जाते. आई आणि वडील दोन्हीही कामावर जातात म्हणून लवकर येऊन बसलेले ते भोळेभाबडे जीव जेव्हा आपल्याला पाहून "मॅडम आल्या, मॅडम आल्या " असं म्हणून सुसाट आपल्या दिशेने पळत सुटतात तेव्हा देवा शप्पथ सांगते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्या क्षणी फक्त मी आणि मीच असते. इतका आनंद होतो ते दृश्य पाहून कि त्याचा वर्णन करणं कठीण आहे. अशीच आजची एक रम्य सकाळ! वेळ साडे सातची! गाडीतून खाली उतरल्या उतरल्या दुसरीचा यश धावत धावत आला आणि मी श्वास घेण्याच्या आधीच हातातली काहीतरी वस्तू दाखवत म्हणाला," मॅडम मॅडम हे पहा, हे तुमच्यासाठी आणलय. नितीनने तयार केलाय ते" काय असेल ते ? gess......हिरव्या हिरव्या पानांची बनवलेली एक सुरेख पर्स! चिमणीच्या हातात शोभून दिसेल इतकी ती छोटीशी! "मॅडम घ्या ना! तुमच्यासाठीच आहे." किती सुंदर अनुभूती! किती अद्भुत जग त्या छोट्यांचे! मी खूपच कुतूहलाने ती हातात घेतली आणि सहज म्हटलं "काय ठेऊ रे यात?" क्षणाचाही विलंब न लावता यश म्हणाला," जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते ठेवा." त्याच्या त्या उत्तराने आणखीनच भारावून गेले. आणि खोल विचारात गढून गेले.....खरंच काय आवडतं आपल्याला सर्वांत जास्त!