रम्य ते बालपण मराठी निबंध
Answers
Answer:
please mark me as the brainliest
Explanation:
रम्य ते बालपण!!
'रम्य ते बालपण' बर्याच जणांकडून ऐकल आहे आणि खुपदा वाचलं आहे...
सणासुदीला घरी आलो कि विचारचक्र भिरभिरत अन् मनाचं कालचक्र उलट फिरायला लागतं, नकळत तुलना चालू होते, लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो सण- समारंभातला.
मग तो सण गौरी-गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांतीचा.
त्यावेळी दुर्वा-आघाडा निवडताना, तोरणं-माळा बनवताना केलीली कुचराई आठवते अन हसु येतं.
देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकेवर मनातल्या बाल-श्रध्देने Happy मात करताना उडालेली तारांबळ;
त्यावेळी सकाळी लवकर उठून आईला केलेली 'मदत' (खरंतर उठलो तीच फार मोठी मदत व्हायची);
सुवासिनी मुंज्या यांना सणाच्या टायमात आलेल्या डिमांड मुळे एकेका दिवशी २-३ घरी जेवायची आमंत्रण असल्याने त्यांच्यामुळे तर कधी वडिलांनी रंगात येऊन पुजा करण्याने दुपारी २-३ पर्यंत लांबणारी जेवणे त्यानंतर आयत्या विड्यांवर ताव मारून कोणाची जीभ जास्त रंगली ते पाहण्यातली मजा;
जांभया येत असतानाही आजोबांनी सक्तीने वदवून घेतलेले श्लोक;
प्रत्येक वर्षी रंगपंचमीला पिचकारी , नागपंचमीच्या जत्रेत जाण्यासाठी लावलेला तगादा तर गणपतीला पायात गोळे अन् डोक्यावर वर्षासरींचा मारा झेलत आरास पाहण्यासाठीची केलीली पायपीट, दसर्याला वडिलांबरोबर केलेल सिमोलंघन.
या सगळ्याबद्दल दरवर्षी तितकीच नवलाई असायची.
मग वाढत्या वयात दहावी-बारावीच्या अभ्यास या सगळ्यांवर वरचढ ठरत गेला पुस्तक समोर घेऊन बसण्याने त्या काहीश्या त्यावेळी कंटाळवाण्या वाटणार्या कामांमधून सुटका मिळाल्याचा समाधान मिळालं पण ते फार काळ टिकलं नाही.
कारण ती सगळी कामं, सणवार, पद्धती साजर्या करण्यात एक वेगळा आनंद असतो ते आत्ता कळतंय
आज जाणवतं ते विश्व फार सुंदर आणि निरागस होतं, जगतो आहे तेच जीवन त्यापलीकड देव हा तेंव्हाचा दृष्टीकोन आता हवा हवासा वाटतो.
त्यावेळी TV मध्ये पाहिलेलं पुणे-मुंबई स्वप्नवत दुनिया वाटायची , उंच उंच इमारती पाहून हरखून जायचो धावणार्या लोकल उडणारी विमानं भुरळ घालायची.
लहानपणीचा ते एक चांगला असत छोटासा बगीचापण मनात आनंदाचा कारंजा उसळून द्यायचा... वय वाढलं कि तुलना चालू होते आणि सुख-आनंद दुरावतो.
आता ती सणांची कामं करायला घेतली तर तासा-दोन तासात संपतात हे लक्षात येऊन लहानपणी केलेल्या चालढकल पणाची गमंत वाटते.
आता खूप वेळ चालून पायात गोळे येत नाहीत कारण पाय दूरच्या अंतरांना सरावली आहेत.
स्तोत्र-आरत्या म्हणण्याचाही फारसा आग्रह आता होत नाही अन कंटाळाहि येत नाही कारण ती १० मिनिटांत संपणार हे ठाऊक झालय.
गणपती शाडूचा वा प्लास्टर ऑफ पॅरीसचा असतो, फटक्यांनी प्रदूषण वाढत , रंगपंचमीचे रंग त्वचेला हानीकारक असतात वैगेरे वैगेरे या सगळ्या जाणीवा वाढल्याने आयुष्यातील रंगतता कमी होते होतेय का?
मग एके दिवशी ३-४ वर्षाची चिमुरडी भाची घरात सोवळ्यात ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीला वडील धार्यांच्या धाकाला धुडकावून कवेत घेऊन घरभर बागडू लागते.
त्याला आपल्यातल खाऊ भरव न्हाउ घाल स्वतः बरोबर निजू घाल या असल्या कारभारान सगळ्यांना मनमुराद हसवते.
एक रसरसीत चैतन्य घरात निर्माण करते.
अन मग रम्य ते बालपण ची खऱ्या अर्थानं फिरून प्रचीती येते!
Answer:
दहावीत पदार्पण केल्यावर एक जाणीव झाली की, आपले l बालपण आता संपले आहे.
अवनी गमली अद्भुत अभिनव ।
जिथे सुखावीण दुजा न संभव ।
घरी वा दारी वात्सल्याचे मळे बहरले ॥
असे कवयित्री शांता शेळके यांनी बालपणाचे वर्णन केले आहे. माझे बालपण हे असेच होते. आज आम्ही एका चांगल्या इमारतीत राहतो; पण माझे बालपण गेले ते आमच्या चाळीत. चाळ जुनी होती; मोठी होती; पण तेथे मला खूप सवंगडी होते. कारण त्या चाळीत आमच्या शिवाय इतर भाडेकरूही होते. सर्वांना चाळ आपलीच वाटत होती. त्यामुळे मालक व भाडेकरू असा काही भेदभाव नव्हता. एका कुटुंबासारखेच आम्ही राहत होतो. त्यावेळी माझे आईबाबा सरकारी नोकरीत होते. त्यांची नेहमी दूरदूरच्या गावी बदली होई.
तेव्हा माझा ताबा माझ्या आजीआजोबांकडे होता. पण मी चाळीतील सर्व माणसांच्या प्रेमात एवढा गुरफटलेला होतो की, आईबाबांची अनुपस्थितीही मला जाणवत नसे. चाळीतील दोस्तांबरोबर मी शाळेत जात होतो. मला शिकवायला गुरुजी येत. तेव्हा माझे दोस्तही माझ्याबरोबर अभ्यासाला बसत. इतर वेळी चाळीत आम्ही भरपूर खेळत असू. टिपूर चांदण्याच्या प्रकाशात सहभोजन करणे, नाटके बसवणे या गोष्टींत आम्ही दंग असू. चाळीत लग्न-मुंजी, बारशी, आवळीभोजन असे कार्यक्रम तर चालतच. पण सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांची तर धमाल उडालेली असे !
अशा सुंदर, गोड वातावरणात माझी चौथी पार पडली. l आईबाबाही बदली संपवून परत आले. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मी पहिला आलो, तेव्हा चाळीत सर्वांना आनंद झाला. पण नंतर ती चाळ सोडून आम्ही नवीन जागेत राहायला गेलो. माझी शाळाही बदलली. पहिले काही दिवस मी बेचैन होतो, अस्वस्थ होतो. चाळ, चाळीतील मित्र यांची मला आठवण येत होती. पुढे नव्या शाळेत व नव्या मित्रांत हळूहळू गुंतत गेलो. पाचवीपासून दहावीपर्यंत मी अनेक नव्या बढती मिळाली. आज त्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण बालपण डोळ्यांपुढे आणि एक छान 'गेट टूगेदर' साजरे करीन !