ramnavmi essay in Marathi
Answers
राम नवमी’ आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटीप्रित्यर्थ साजरी केली जाते.भगवान रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी झाला होता.
कौसल्या म्हणजे कौशल्य आणि दशरथ चा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत.आपल्या शरीराला दहा अंग आहेत,पंच ज्ञानेंद्रिय आणि (दोन हात,दोन पाय,जननेन्द्रिय(उत्सर्जन इंद्रिये) आणि तोंड अशी) पंच कर्मेंद्रिये.
सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्रीभाव ठेवते.कैकयी म्हणजे जी सदैव सर्वाना निस्वार्थपणे देत रहाते.
अश्यातऱ्हेने राजा दशरथ आणि त्याच्या या तिन्ही राण्या एका ऋषीकडे गेल्या.त्या ऋषीने त्यांना दिलेल्या प्रसादामुळे आणि देवाच्या कृपेने भगवान रामांचा जन्म झाला.
राम म्हणजे अंतःप्रकाश, लक्ष्मण ( भगवान रामाचा लहान भाऊ ) म्हणजे सजगता.शत्रुघ्न म्हणजे अजातशत्रू आणि ज्याला कसलाही विरोध नाही.भरत म्हणजे योग्य,प्रतिभावान.
अयोध्या (येथे भगवान रामाचा जन्म झाला) म्हणजे असे स्थळ जे केंव्हाहि नष्ट होऊ शकणार नाही.