India Languages, asked by traptigupta2352, 1 year ago

Ramya sakal essay in marat

Answers

Answered by ALIA111112
5
I don't know Marathi language so sorry
Answered by fistshelter
6

Answer:खरं तर सकाळ सकाळी लवकर उठून शाळेत जावे लागते म्हणून आम्हा मुलांना सकाळ आवडत नाही. इतकी छान साखरझोप लागलेली असते पण सकाळ झाली की ती मोडते.

परंतु सकाळ इतकी वाईट नसते हे मला एकदा लवकर उठल्यावर कळाले. एकदा काय झालं मी रात्री लवकर झोपी गेले त्यामुळे मला पहाटे जाग आली. आईसुद्धा उठली होती. ती देवपूजा करायला घेणार होती. मी लवकर अंघोळ करून आलेली पाहून ती म्हणाली 'व्वा, आज लवकर तयार झाली. जा बागेतून फुले आण देवासाठी.' मी बाहेर गेले. सूर्य नुकताच उगवू लागला होता. आसमंत आल्हाददायक रंगांनी सजले होते. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता. आईने अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. जवळच प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडला होता. मोग-याचा दरवळ अंगणभर पसरला होता. मंदिरात सकाळची आरती चालू होती. सगळ्या वातावरणात प्रसन्नता भरून राहिली होती. अशी रम्य सकाळ मी रोज गमावत होते. त्या दिवसापासून रम्य सकाळ रोज अनुभवण्यासाठी मी लवकर उठण्याचा निश्चय केला.

Explanation:

Similar questions