ररांग ढंग या कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या परिचय दया
Answers
Answer:
खूप वर्षांपूर्वी रारंग ढांग ह्या विचित्र नावाचे पुस्तक पाहिल्यानंतर वाटले काय आहे हे रारंग आणि ढांग. त्यात आणखीन ढांग हा मराठी शब्द परिचयाचा असतो, पण रारंग आणि ढांग हि जोडगोळी कानांना बरी वाटली तरी काय प्रकरण आहे हे समजले नव्हते. पुस्तक प्रभाकर पेंढारकर यांनी ते लिहिले होते. त्यांचे चक्रीवादळ हे पुस्तक वाचले होते. त्यांची पुस्तके पूर्णपणे काल्पनिक नसतात हे माहिती होते. तसेच हे देखील निघाले. प्रभाकर पेंढारकर हे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र. ते देखील चित्रपट क्षेत्रातच. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन मध्ये देखील काम केलेले, बरेच माहितीपट तयार केले. रारंग हे हिमाचल प्रदेशातील सिमल्याच्या ईशान्येकडे, तिबेटच्या सीमेजवळ असलेले एक गाव आहे. नकाशात एक बौद्ध मठ देखील दिसतो जवळपास. आणि ढांग म्हणजे तेथील स्थानिक भाषेत डोंगराची कडा. प्रभाकर पेंढारकर यांचे हे पुस्तक तसे खूप जुने म्हणजे १९८० मधील आहे. तर मी आज त्याबद्दल का लिहितो आहे? कारण ह्या पुस्तकाचा उत्तरार्ध म्हणून गाजलेले ‘रारंग ढांग नंतर…’ हे श्रीकृष्ण सवदी यांचे २०१४ मधील पुस्तक नुकतेच वाचले हे निमित्त.
आधी रारंग ढांगची कथा थोडक्यात. हिमालयातील पर्वतांच्या उंची एवढ्या उंचीवर जगात भारत हा बहुधा एकमेव देश असावा. हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिपत्याखाली करते. कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दुसऱ्या दशकाचा आहे, ज्यावेळी भारतात नेहरूंच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधा निर्माणाच्या करिता विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. कथेचा नायक विश्वनाथ, जो अभियंता आहे, तो खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेच्या साठी आवश्यक असल्याने, त्यांचे या कामावर नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील बिनलष्करी अभियंता असतो. त्यामुळे त्याचा नेहमी इतर लष्करी सहकारी, अधिकारी यांच्याकडून उपहास उपहास केला जातो. रारंग ढांग ह्या उभ्या कड्यातून रस्ता तयार काढण्याच्या कामाच्या वेळेस तो लष्कराने केलेल्या आराखड्याप्रमाणे काम न करता, अधिक सुरक्षित उपाययोजना करतो, त्यामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरे जावे लगते. पुढे त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची नोकरी कायम होत नाही, त्याचा करार रद्द होतो, आणि त्याला त्यातून अतिशय खंत मनाने बाहेर पडावे लागते. त्याचे मुंबईतील उमा नामक चित्रकार तरुणीबरोबरच पत्रव्यवहार, प्रेमाचे धागे ह्याचे देखील चित्रण कादंबरीत येते. प्रभाकर पेंढारकर यांनी ह्या सर्व बाजूंचे, तेथील वातावरणाचे, लष्करी शिस्त, कोर्ट मार्शलची प्रक्रिया, मतभेद, याचे मनोवेधक चित्रण केलेले होते.
मौज प्रकाशनकडून प्रकाशित प्रभाकर पेंढारकरांचे “ रारंगढांग ” हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. १९८१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबद्दल आत्ता, म्हणजे जवळपास ३० वर्षांनी २०१०- ११ मध्ये अंतर्जालात “ फार चांगलं आहे, फार चांगलं आहे ” असा गहजब का उडावा हे पुस्तक एका बैठकीत पूर्ण वाचूनही कळले नाही. कारण एवढे सगळे ब्लॉग व विविध साईट्सवर या पुस्तकाची वाहव्वा वाचून मी हे पुस्तक विकत घेतलं. मला या पुस्तकातलं काय आवडलं नाही म्हणाल, तर शैली व त्याचा कथाविषय! तो सांगू का नको? सांगतोच.
एक मुलकी अभियंता मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतीय सैन्यात बॉर्डर रोड मध्ये सैनिकी अभियंता म्हणून नोकरी धरतो. जे सगळीकडे असतं ते शिस्त शिस्त असा उद्घोष करणाऱ्या सैन्यातही असायचंच! ते म्हणजे वरिष्ठांची “ नियम आणि शिस्त ” या गोंडस सबबीखाली चालणारी अधिकारशाही! अधिकारशाही ऐवजी मनमानी असा शब्द वापरणार होतो, पण गोष्ट सैन्यातील असल्याने ही मनमानी नसून अधिकारशाही आहे. फिल्डवर काम करणाऱ्याला त्याच्या आकलनाप्रमाणे व्यापक हित लक्षात घेऊन आवश्यक असेल तसे काम न करू देता केवळ नियम व शिस्त या सबबीखाली बसेल तसे काम करून घेणे, मग त्या माणसाने आदेश व नियम धाब्यावर बसवून लोकहितासाठी बंडखोरी करणे वगैरे कथेत होत जाते. हे आपणही रोजच्या आयुष्यात अनुभवतच असतो, त्यामुळं पुस्तक वाचून घ्यावा असा नवा अनुभव यात काहीच नाही.
कादंबरीचा नायक मनासारखं काम करता येत नाही म्हणून मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सैन्यात नोकरी धरतो, आणि तिथेही त्याला पळसाला पाने तीनच हा अनुभव येतो – हा घटनाक्रम महत्वाचा आहे. पण कथानायकाने मुंबईतील नोकरी का, कशी सोडली, सैन्यात नोकरी कशी धरली हे स्थित्यंतर लेखकाने पुस्तकात बिलकुल रंगवलेले नाही.
#SPJ3