रसिक/रजनी जाधव हे शारदा विद्यालय,बोरिवली या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी वन-अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीयांना वनमहोत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी रोपेपुरवण्याची मागणी करणारे पत्र लिहीत आहेत
Answers
पत्र लेखन.
Explanation:
रसिक जाधव,
शारदा विद्यालय,
बोरीवली.
दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय वन अधिकारी,
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,
बोरीवली.
विषय: रोपांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
मी, रसिक जाधव, शारदा विद्यालयचा विद्यार्थी प्रतिनिधी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहत आहे.
दरवर्षी आमच्या शाळेत वनमहोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवले जाते, जिथे शाळेतील सगळे विद्यार्थी आवडीने भाग घेतात. वृक्षारोपणाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात आम्ही आतापर्यंत विविध प्रकारची झाडे लावली आहेत.
यावर्षी सुद्धा आमच्या शाळेत वनमहोत्सवात वृक्षारोपण ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आम्हाला रोपांची गरज लागणार आहे.
मी तुम्हाला नम्र विनंती करतो की खालील दिलेल्या यादीप्रमाणे शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर रोपे पाठवावी.
रोपांची यादी:
झेंडू - ३० रोपे.
गुलाब- ३० रोपे.
मोगरा -२५ रोपे.
चाफा - ३५ रोपे
गुलमोहर- १५ रोपे
धन्यवाद.
आपला विश्वासु,
रसिक जाधव.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
Explanation:
magani patra: o+ raktagatachi magani karnya babat