रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा
Answers
❥︎ रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा
❥︎दिनांक २ नोव्हेंबर २०२१
प्रति, श्री. महादेव घोरपडे.
माननीय व्यवस्थापक,
आनंद पुस्तकालय,
१०२, विकास नगर,
गाळा नं. २, जालना.
विषय : पुस्तकांच्या मागणीबाबत.
महोदय,
सर्वप्रथम, आनंद पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
मी कुमार अ.ब.क. मला माझ्या जीवनात पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. पुस्तके वाचल्याने ज्ञानामध्ये भरीव आणि दिर्घ भर पडते. शब्दसंपत्ती मध्ये वाढ होते. यामुळे भाषण त्याचबरोबर संभाषण कौशल्यावर प्रभूत्व प्राप्त होते. बोलण्यामध्ये विविध सर्मपक शब्दांचा उत्तम प्रकारे वापर करता येतो. विविध स्पर्धात्मक परीक्षांना समर्थपणे तोंड देता येते. यासाठी विविध विषयावरील पुस्तके वाचण्यास मला खूप आवडतात. परंतू मला हवी असणारी, माझ्या आवडीची पुस्तके आमच्या येथे मिळत नाहीत. त्यामुळे एक रसिक वाचक या नात्याने आपल्या आनंद पुस्तकालयातून माझ्या आवडीची दहा पुस्तके मागवू इच्छितो.
माझ्या आवडीच्या पुस्तकांची यादी या पत्रासोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके आपण लवकरात लवकर आमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत कृपया या पुस्तकांचे बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या सर्व पुस्तकांवर आमच्यासाठी योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. स्विकारून योग्य सहकार्य करावे.
पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे :
क्रमांक पुस्तकाचे नाव लेखक प्रती
१. श्यामची आई पां. स. साने ३
२. ययाती वि. स. खांडेकर १
३. देह झाला चंदनाचा राजेंद्र खेर ३
४. मराठी व्याकरण. मो. के. दामले १
५. सावित्री पु. शि. रेगे २
६. नॉट गॉन विथ द विंड विश्वास पाटील ५
७. गोष्टी रुप आंबेडकर डॉ. देशपांडे ३
८. टारझन. अशोक व्हटकर ५
९. हनुमान उपासना महादेव घोरपडे ४
कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,
अ.ब.क.
पत्ता
बी - ५०१, सत्यम प्राईम,
कात्रपनाका, ठाणे (प.)
मुंबई - ४०००५१