रस्ता च्या दोन्ही बाजूंनी स्थापन झालेल्या वस्ताना काय म्हणतात
Answers
Answered by
0
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्थापन झालेल्या वस्त्यांना रेषीय वस्त्या असे म्हणतात.
रेषीय वस्त्या कशा असतात ?
- रेषीय आकाराच्या वस्त्यांची निर्मिती नदी, कालवे, रस्ते, समुद्रकिनारे यांच्या बाजूला होत असते.
- नदीच्या दोन्ही काठावर समांतर रचनेत घरे असतात तर रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस ह्या प्रकारची रचना दिसते.
- महाराष्ट्रामध्ये अनेक वस्त्या रस्त्याच्या कडेला विकसित झाल्या आहेत.
- उदा., पुण्याजवळील खेडशिवापूर ही वस्ती रस्त्याच्या कडेला म्हणजेच पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या दोन्ही बाजूला वसलेली आहे.
- रस्त्याच्या किंवा नदीकाठाच्या, कालव्याच्या कडेला सरळ रेषेत विकसित झालेल्या वस्त्यांना रेषीय वस्त्या असे म्हणतात.
- उत्तर भारतामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी रेषीय वस्त्या दिसतात.
- केरळमध्ये कायलच्या दोन्ही बाजूला समांतर वस्त्या वसलेल्या आहेत. श्रीवर्धन ह्या ठिकाणी किनारा सरळ असून त्याला समांतर वस्त्या आहेत.
Reference link- https://brainly.in/textbook-solutions/q-1-ressiiy-vs-tii-1
#linearinmarathi # settlement #वस्ती #rasta
Similar questions