India Languages, asked by sushanttripathi64, 11 months ago

रस्त्याची अवस्था - अडचणी वा उपाय ..​

Answers

Answered by bestanswers
3

रस्त्याची अवस्था - अडचणी वा उपाय ..​

आजकाल सगळ्या महानगरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.  

अडचणी :

  • जागोजागी खड्डे पडलेले आढळतात. त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. खड्डयामुळे माणसांना रस्त्यावर चालणेही कठीण होते.  
  • रस्त्यालगत असलेली गटारे तुंबलेली असतात. पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतूक कोंडी होते.  
  • अनेकदा रस्त्यावर खोदकाम करून ते खड्डे वेळेच्या वेळी बुजवत नाहीत.  
  • रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून ते पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते आणि ते त्यांना अडचणीचे होते.  

उपाय :

  • रस्ते बांधताना लागणारी साधन सामग्री हि चांगल्या प्रतीची वापरली तर खड्डे पडण्याची शक्यता कमी होईल.
  • वेळच्यावेळी खोदकाम करून तयार केलेले खड्डे बुजवले गेले पाहिजेत.  
  • रस्त्यालगत असलेली गटारे सतत साफ केली पाहिजेत.  

Similar questions