India Languages, asked by Sandhyahujare19, 3 months ago

रस्त्यावर सिग्नलजवळ कोरी करकरीत मोटार थांबली आहे. मागून एक एस.टी. बस येऊन मोटार गाडीजवळ उभी राहते. दोन वाहनात झालेल्या संवाद.​

Answers

Answered by rutujakondamangal
1

आपल्या कल्पनेच्या दृष्टीने केलेला सं वाद आहे.

एस. टी. बस : काय रे आज खूप छान दिसत आहेस तू ?

मोटार : अच्छा ! मी का तुम्ही मला विचारलं का ?

एस . टी : अरे ! हो मी तुलाच म्हणालो

मोटार : बर बर ,मी आहेच आदी पासून छान

आताच तर मला तयार केलंय पाहिलं नाहीस का मला .

एस.टी : अरे हो पाहिलं की

मोटार : माझ्या कडे पाहा मी किती नवीन कोरा करकरीत आहे आणि तू ???

एस: टी : काय झालं रे बाबा आता मला ??

मोटार : तू तसाच आहेस , जसा होतास तसा . किती रे कुणालाच तुझ्या कडे यावं नाही वाटेल !

एस: टी : अरे वेड्या ,मी सर्वसामान्य लोकांना नेणारा एक साधारण बस आहे माझं असं काही नाही .

तू जेव्हा इथे आला नाहीस ना त्या काळापासून मी इथे आहे ; लोकांना त्यांच्या वाटेवर सोडतो , तुला काय माहिती ?

मोटार : मी किती चकचकीत आहे नवीन तू कसा आहेस रे ?

सर्वांना मी आवडतो सगळ्यांना माझ्या स्वारी करायला आवडते ,बघ हो की नाही ?

एस.टी : आपण सगळे वाहनं रे , असं कसं म्हणतोस ?

आताही खूप सारे जण एस.टी ने जातातच की असा काही नाही रे ,आपण सगळे मदत करणारे आहोत , असं वेगळं असं काही नसतं

मोटार : अरे हो ! मला समजलं नवं चकचकीत नाही नसतं सगळे वाहनं असतात मदत करणारे लोकांना .

Similar questions