Art, asked by vedikam69, 2 months ago

) रसग्रहण:
पुढे दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :
'सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो.​

Answers

Answered by himesht33
3

I Don't know uuwjuggw8gw8g8wy8e

Answered by gavandchetan4
2

Answer:

आशयसौंदर्य : 'केकावली' या काव्य ग्रंथ के समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही 'भरतवाक्य' काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.

काव्यसौंदर्य : 'सुसंगती' म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. 'सुजनवाक्य' म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. 'घडो-जडो' या यमक प्रधान क्रिया पदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.

Similar questions