India Languages, asked by vanitakamble1811, 9 months ago

रसग्रहण
प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण करा:
‘भरकटलेल्या जगात नाही
संस्काराची जाण कुणाला
तुळशीवरल्या त्या पणतीचे
जळणे मजला शिकवून गेले'
उत्तर:​

Answers

Answered by rajraaz85
14

Answer:

दिलेल्या काव्यपंक्ती या प्रसिद्ध निसर्गकवी नितीन देशमुख यांच्या 'जीवन गाणे' या कवितेतील आहेत.

Explanation:

नितीन देशमुख हे आपल्या काव्यातून निसर्ग व निसर्गात असणार्‍या अनेक गोष्टी बद्दल आपले मत मांडतात. निसर्गातील प्रत्येक गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवत असते, आपल्यावर काहीतरी संस्कार करत असते, अशी भावना ते आपल्या कवितेतून मांडतात.

प्रस्तुत ओळींच्या माध्यमातून ते सांगतात की हे जे जग आहे ते विखुरलेले आहे, भरकटलेले आहे, या जगाला कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही आणि त्यामुळेच येथील लोकांना त्यांच्यावर झालेल्या संस्काराची आठवण पडत आहे. लोक आपले संस्कार विसरत आहेत. आणि अशा भरकटलेल्या अवस्थेत निसर्गाकडे जर बघितले तर निसर्गच आपल्याला काहीतरी शिकवून जाते.

कवी म्हणतो, की तुळशीवृंदावनात असणारा तो छोटासा दिवा म्हणजे पणती स्वतः जळत असते व लोकांना प्रकाश देत असते. त्या पणतीकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल,की इतरांना जर प्रकाशमान करायचे असेल तर स्वतःला जळावं लागते. स्वतः कष्ट केल्याशिवाय, स्वतः त्रास सहन केल्याशिवाय आपण दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी देऊ शकत नाही असा विचार कवी आपल्या प्रस्तुत ओळींतून मांडतात.

Answered by Pinkmind
0

Answer:

तंत्रयुगात जग 'आनंदा' पासून भरकटत चालले आहे. स्वैराचाराने मूल्ये हरवताना दिसत आहेत. संस्कार लोपले आहेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी पणती कवीपुढे आदर्श आहे. सायंकाळी तुळशीपुढे तेवणारी पणती, तेवत राहून अंधाराचा नाश करते. प्रकाश देते. माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने तेवत राहिले पाहिजे.

पणतीचे रुपक, भरकटलेले जग या संकल्पनांनी कवितेचे आशयसौंदर्य खुलले आहे. तुळशीची पवित्रता अर्थसौंदर्य निर्माण करते.

Similar questions