रशिया ची राज्य घटना कोणत्या सालि लीहली
Answers
Answer:
एक सामर्थशाली साम्यवादी राष्ट्र व क्षेत्रफळानुसार जगातील सर्वांत मोठा देश. देशाचे अधिकृत नाव ‘युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स’ (यू. एस.एस्. आर.) सामान्यतः ‘रशिया’ किंवा क्रांतीनंतर ‘सोव्हिएट युनियन’ असा त्याचा नामोल्लेख केला जातो. देशाचे क्षेत्रफळ २,२४,०२,२०० चौ. किमी. आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सु. एक-सप्तमांश (सु. १५%) क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग (५५,७१,२०० चौ. किमी.) तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सु. दोन-पंचमांश भाग (१,६८,३१,०० चौ. किमी.) या देशाने व्यापलेला आहे. दक्षिण अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडांपेक्षाही या देशाचा आकार मोठा असून तो जवळजवळ उत्तर अमेरिका खंडाएवढा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा चीनच्या दुपटीपेक्षा मोठा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपेक्षा अडीचपटीने, तर भारताच्या सातपट मोठा आहे. तथापि रशियाची जवळजवळ ७०% भूमी शेतीच्या दृष्टीने निरूपयोगी असून बऱ्याच भागांत मानवी वस्तीही आढळत नाही. रशियाची लोकसंख्या २७,६२,९०,००० (१९८५ अंदाज) असून लोकसंख्येच्या बाबतीत चीन व भारत यांच्यानंतर रशियाचा तिसरा क्रमांक लागतो. देशाचा अक्षवृत्तीय विस्तार ३५०८’ ते ८१०५०’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १९०३८ पू. ते १६९०४’ प. यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम विस्तार १०,९०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ४,५०० किमी. आहे. पूर्व-पश्चिम विस्तार जास्त असल्यामुळे जगातील एकूण २४ कालपट्टांपैकी ११ कालपट्ट रशियात आहेत. देशात १५ प्रजासत्ताकांचा समावेश असून त्यांशिवाय आर्क्टिक महासागरातील फ्रान्स जोझेफ लँड, नॉव्हायाझीमल्या, सेव्हर्नायाझीमल्या, न्यू सायबीरियन बेटे, रँगल बेटे व पॅसिफिकमधील कमांडर बेटे, कूरील बेटे, सॅकालीन बेट यांचा समावेश होतो. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ सु. ३,१०,८०० चौ. किमी. आहे. रशियाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर त्यातील बॅरेंट्स, कारा,लॅपटेव्ह, पूर्व सायबीरियन व चुकची हे समुद्र, पूर्वेस बेरिंग, ओखोट्स्क व जपानचा समुद्र, दक्षिणेस उत्तर कोरिया, चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, कॅस्पियन समुद्र, व काळा समुद्र, तर पश्चिमेस रूमानिया, हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, फिनलंड, नॉर्वे हे देश व बाल्टिक समुद्र आहे. देशाची एकूण सरहद ८०,३०२ किमी. असून ती जगात सर्वांत लांब आहे. उत्तर व पूर्व सीमा सागरी स्वरूपाच्या आहेत. रशियाला एकूण बारा देशांच्या तसेच आर्क्टिक, अटलांटिक, पॅसिफिक महासागरांच्या व त्यांतील बारा समुद्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत. मॉस्को (लोकसंख्या ८६,४२,०००–१९८५ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे, सर्वांत मोठे व जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.
Explanation:
your answer