rashtriy utpannachya chakriy prwahache dvishetr prtiman spash kra
Answers
Answer:
pls write the question properly it's not correct
मानवी गरजा भागविण्यासाठी वस्तू व सेवाकर्मे यांचे उत्पादन करणे हे देशातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्य आहे. उत्पादनाची क्रिया होत असताना त्याचबरोबर उत्पादक घटकांना उत्पन्न आणि उत्पादनाचा उपभोग, भांडवली वस्तूंचे संचयन अशा प्रकारे उपयोग किंवा व्यय होत असतो. उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातील वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातील एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातील किंवा कालखंडातील ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.
राष्ट्रीय उत्पन्नाची जगातील पहिली परिगणना १६६५ मध्ये इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी (१६२३–८७) यांनी केली. १६९०–९६ मध्ये फ्रान्समध्ये असा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर रशियामध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस व अमेरिकेत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या परिगणना झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इतर यूरोपीय राष्ट्रांत असे प्रयत्न सुरू झाले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १९१९–३९ या काळात राष्ट्रीय उत्पन्न काढले गेलेल्या देशांच्या संख्या १३ वरून ३३ पर्यंत वाढली. यांमध्ये कॅनडा, रशिया आदिकरून नऊ देशांत शासनाकडून हे काम केले जात होते.