रविवार नास्ता तर...
Answers
⠀⠀⠀⠀⠀आठवड्यामध्ये रविवार नसता तर...
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवसाचे सगळे रूप, सगळे वागणे इतर दिवसांपेक्षा नक्कीच वेगळे. असा हा रविवार आठवड्याच्या वेळापत्रकातून हरवला तर...? तर सगळीच गंमत नाहीशी होईल.
'रोज रोज शाळा। मनाला येई कंटाळा।।' रविवारी शाळा नसते. त्यामुळे उशिरापर्यंत गादीवर लोळायला मिळते. मी जरा आळस केला की, आई रागावते. मात्र रविवारी ती म्हणते, “झोपू दया त्याला. रोज लवकर उठावे लागते." रविवारी दुपारी आई अभ्यास घेऊ लागली, तर बाबा म्हणतात, "अग आज रविवार, आज अभ्यासाला सुट्टी!" असा रविवार कोणाला आवडणार नाही?
रविवारी आईच्या कचेरीला सुट्टी असते. मग ती मस्त जेवण बनवते. दुपारी बाबांबरोबर बुद्धिबळ, कॅरम यांसारखे खेळ रंगतात. दर रविवारी आम्ही संध्याकाळी फिरायला जातो. कधी कधी दूर कुठे तरी. कधी कधी नातेवाईकांकडे जातो. मग बाहेरच जेवण, त्यांतही प्रत्येक वेळी वेगळेपणा असतो. असा हा रविवार संपला की, वाईट वाटते. मग रविवार नसेल, तर आठवडा कसा आवडेल?