रविवारची सुटटी नसली तर निबंध मराठी
Answers
■■रविवारची सुट्टी नसली तर!!!■■
आपल्या सगळ्यांचा आवडता वार रविवार असतो.आपण सगळेचजण रविवारची वाट पाहत असतो. असे वाटते कधी रविवार येतो आणि कधी आपल्याला एक दिवसाच्या सुट्टीमध्ये आराम तसेच मजा करायला मिळते.
तेव्हा,रविवारची सुट्टी नसली तर, हा विचारच मनात भीती निर्माण करतो.रविवारची सुट्टी नसली तर,आठवड्यातले सगळेच दिवस एकसारखे वाटतील.
रविवारची सुट्टी नसली तर, आपल्याला रविवारी आपल्या कुटुंबासोबत,मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाता येणार नाही.सकाळी उशिरा उठता येणार नाही.आरामात आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवता येणार नाही.
आठवड्याचे सात दिवस काम करत राहिल्यामुळे, आपण खूप थकून जातो. रविवारी आपण आराम करतो.जर रविवारची सुट्टी नसली तर, आपले शरीर थाकल्यामुळे आजारी पडण्याची भीती वाढेल.
रविवारची सुट्टी नसली तर, आपल्याला स्वतः साठी नीट वेळ मिळणार नाही, ज्यामुळे आपण कंटाळून जाऊ.आपला ताण वाढेल.याचा परिणाम आपल्या कामावर दिसू लागेल.
तेव्हा,रविवारची सुट्टी नसली तर, लोकांना फार त्रास होईल. त्यामुळे रविवारची सुट्टी ही हवीच.
Answer:
निबंध लेखन :(कल्पनाप्रधान) रविवारची सुट्टी नसती तर..…! *
5 points