India Languages, asked by zadevaishu, 5 months ago

Read the following and answer the following questions.

जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले . रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता . त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैज्ञानिक शोधांबद्दल , साहित्याबद्दल , आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली . त्यांच्या गावात एस . टी . आर माणिकन् नावाचे एक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते . त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता . त्यांनी कलाम यांना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले . शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता . तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता . रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्रांचे गठे येत . पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी . दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते . १ ९ ३ ९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली . चालत्या गाडीतून ते गठे फेकले जात . ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला . अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई ! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी , रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली . वडील म्हणाले , " अब्दुल , तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायला हवे . ' शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले . कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती . जलालुद्दीन म्हणाला , “ मनामध्ये नेहमी आशावादी , भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा . त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल .

Answer the questions based on the passage

Q1. स्वमत- पाठाच्याआधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा .​

Answers

Answered by mangeshkendre8649
0

Answer:

कितीही संकटे आली तरी धीर न सोडता आपल्याला पुढे जात राहायचे आहे.जसे पाठात सांगितल्या प्रमाणे आपण सतत आपल्या भविष्याबद्दल चांगले विचार ,मोठे कार्य या बद्दलच विचार केला पाहिजे. आपण जेवढ स्वतःला स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी झोकून देऊ,तितकेच आपल्यासाठी चांगले आहे. फक्त आपण नेहमी आशावादी राहील पाहिजे.स्वतःच्या मनाला हे पटवून दिले पाहिजे,की कितीही संकटे आली तरी ती आपण धर्याने पार करू.आपण एकना एक दिवस हे जग जिकुच.

धन्यवाद!!!!शुभ सकाळ

Similar questions