India Languages, asked by UsmanSayyed3155, 11 months ago

Report writing on farewell of 10th std students in marathi

Answers

Answered by ShamaShinde
5

Explanation:

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा (प्रिलिम्स) संपल्या, की शाळा-शाळांमधून 10th students farewell कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विद्यार्थीदेखील त्याची जोरदार तयारी करतात. पण हे सगळं करीत असताना त्यांच्या मनात संमिश्र भावना असतात. नवीन कॉलेजविषयी औत्सुक्य असतं, तर आपली शाळा आणि तेथील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागणार याची रुखरुख असते. हे लक्षात घेऊनच या दिवशी संपूर्ण शाळा या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करतात, आत्मविश्वास निर्माण करतात आणि गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत, हा विश्वास, आश्वासक आधारही देऊ करतात.

शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा (लव्हाळी, ता. अंबरनाथ) येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण १० वर्षे आश्रमशाळेत राहिल्याने तो भावनिकरीत्या जोडला गेलेला असतो. आदिवासी बांधवांची जीवनशैली सर्वसाधारण समाजापेक्षा खूपच वेगळी असल्याने मुख्य समाजप्रवाहात सामावून घेऊन स्वत:ला सिद्ध करणे हे या मुलांसाठी मोठे आव्हान असते. इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात, तर दहावीचे विद्यार्थी आपले अनुभव सांगतात. गेल्या वर्षी पहिली आलेली विद्यार्थिनी निरगुडा हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, अगदी शिपाईदेखील सर्वानी शुभेच्छा दिल्या. तुमच्या प्रयत्नांच्या बळावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि शाळा सदैव तुमच्यासाठी आहे, हा विश्वास देण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न साऱ्या भाषणांमधून प्रकर्षांने जाणवत होता.

ठाण्यातील वसंत विहार परिसरातील अनमोल विद्यालयातील निरोप समारंभात विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग आणि पदाधिकारी आवर्जून सहभागी होतात. या वर्षी दीपप्रज्वलन, स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. इयत्ता आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसमोर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वानी आपण कळत नकळत कोणत्या चुका केल्या आणि त्या इतर सर्व विद्यार्थ्यांनी का करू नयेत, ते प्रांजळपणे सांगितले. इयत्ता आठवी-नववीच्या वर्गप्रतिनिधींनी त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पदाधिकारी प्रत्येकाने विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या, पण त्याचबरोबर पोटतिडिकीने चांगले वागण्याचा, चांगल्या मार्गावरून प्रयत्नांची कास धरून वाटचाल करण्याचा, चांगले आचारविचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनीदेखील आयुष्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते सांगताना तुमचे आयुष्य तुम्हाला घडवायचे असल्याने तुम्हालाच विचार करून पुढे जायचे आहे, ते सोप्या भाषेत समजावून सांगितले.

Answered by siddhikajhanwar4
0

Answer:

writing this was not possible

Explanation:

please understand the situation..

Attachments:
Similar questions