India Languages, asked by Anonymous, 1 year ago

report writing on science exhibition held in school in marathi

Answers

Answered by vibhanshuj
25
म. टा. प्रतिनिधी, नाशिक 

संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले. 

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग व नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू मराठा हायस्कूलमध्ये गुरुवारी महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून, २४७ प्रकल्पांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. न्यूटनच्या तिन्ही नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर भानसी बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांनी संशोधन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रत्येक मुलात संशोधक लपला असून, त्याला जागे करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले. 
या वर्षी आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या विषयांवर २४७ प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रकल्प सादर करुन विज्ञानाविषयी गोडी दाखवून दिली आहे. प्रदर्शनाचे प्रास्ताविक मनपाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी केले. विद्यार्थीदशेत संशोधनाचे बीज त्यांच्यात रोवावे, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन कविता सोनवणे व स्मिता अहिरराव यांनी केले. तर आभार अनिल माळी यांनी मानले. यावेळी मविप्र संस्थेचे संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजीराव गांगुर्डे, संभाजी मोरुस्कर, मुख्याध्यापक सी. टी. साळवे, वनिता पाटील आदी उपस्थित होते. 

लक्षवेधक प्रकल्प 

स्पीड ब्रेकरद्वारे वीजनिर्मिती 

रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात. स्पीड ब्रेकरवर वाहने आपली ऊर्जा गमवून वेग कमी करतात. हीच उर्जा परत मिळवून तिचे रुपांतर विद्युत ऊर्जेत करू शकतो, या उद्देशाने स्पीड ब्रेकरद्वारे वीजनिर्मिती हा प्रकल्प लक्षवेधक ठरत आहे. 

इलेक्ट्र‌कि पॉवर कार 

इलेक्ट्र‌कि मोटर, कंट्रोलर, बॅटरीचा वापर करुन इलेक्ट्र‌कि पॉवर कारचा प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आला आहे. कार्बनचे कमी उत्सर्जन, तसेच वायू व ध्वनी प्रदूषण कमी होईल, अशा पद्धतीने या वाहनाची रचना करण्यात आली आहे. 

गणितीय प्रतिकृती 

विद्यार्थ्यांना गणित व भूमिती विषयाची भीती वाटते. त्यातील संकल्पना स्पष्ट न झाल्याने त्यांना हे विषय कठीण वाटतात. गणितीय प्रतिकृती या शैक्षणिक साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना भूमितीमधील प्रमेये समजून सांगण्यास मदत होते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म स्पष्ट करता येतो. तसेच समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणारे संगत कोन एकरुप असतात हे प्रत्यक्ष अनुभवता येते.



vibhanshuj: mark me as a brainliest
vibhanshuj: plzzz
Answered by archana2025
12

,hope this will help you

Attachments:

Piyushjindal2005: Hi
Piyushjindal2005: Archana fir profile photo laga li
Piyushjindal2005: Mai fir pyar karu.hahaha
Similar questions