Report writing on vrukshropan in Marathi
Answers
Answer:
i don't knowsorry pleash asked some one
प्रस्तावना:
मानव आणि निसर्ग यांचा भरपूर पुराना संबंध आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला.
या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचा मानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे. जंगले आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौंदर्याचा साठा आहेत.
या जंगलांमधून पोसणारे निसर्गाचे स्वरूप हे मानवाला प्रेरित करते. जर या धरतीवर वन किंवा जंगल नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण आहे.
झाडांपासून मिळणाऱ्या विविध गोष्टी
प्राचीन काळापासून जंगल मानवाच्या अनेक गरज भागवत आहे. वृक्ष हे मानवाला फळ,फुल, भोजन, औषधी वनस्पती आणि इंधन प्राप्त करून देतात. तसेच घरे बांधण्यासाठी लाकूड प्रदान करतात.
त्याच प्रमाणे सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे वृक्ष सर्व प्राणी, पक्षी आणि मानव जातीला शुद्ध हवा प्रदान करतात. वृक्ष सर्व सजीवांना आणि मानवाला शुद्ध ऑक्सिजन प्रदान करून स्वतः हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात.
वृक्ष प्रदूषण रोखण्याचे, मातीची धूप होण्यापासून रोखणे. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात.
वृक्षांचा उपयोग
मानव वृक्षांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये इंधनाच्या रूपाने करतो. तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो. वृक्षांमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा असतात. वृक्ष आपल्याला उन्हाळ्यात सावली प्रदान करतात. वृक्षांपासून मानव उद्योगांना लागणार कच्चा माळ तयार करतो. तसेच वृक्षांपासून मानवाला रबर, माचीस, गोंद आणि कागज इ वस्तू तयार करतो.
जीवनाचा आधार
वृक्ष हे फक्त मानवाच्या जीवनाचा आदाहर नाही आहेत तर प्रत्येक प्राणी आणि पक्षी यांच्या जीवनाचा सुद्धा आधार आहेत. मानव घर बांधून राहू शकतो.
परंतु निसर्ग हाच प्राणी आणि पक्षी यांचा सर्वात मोठा आधार आहे. कारण बहुतेक पक्षी हे झाडांवर आपला घरटा बांधून राहतात.
संत तुकाराम यांचा अभंग
संत तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये म्हटले आहे की,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
संत तुकाराम महाराज हे एकांतवासासाठी देहूच्या डोंगरावर जात असत. त्यांनी पशु – पक्षी, फुले, वेली आणि वृक्ष यांच्याशी नाते जोडले होते. ते आपले मन त्यांच्याशी व्यक्त करत असत.
संत तुकाराम म्हणायचे की, मी एवढा तयार लीन झालो होतो पक्षी सुद्धा माझ्या सुरत सूर मिसळून गायचे. हा निसर्गाचा सहवास त्यांना दुःखाच्या दारातून दूर नेऊन मोक्षाचा आनंद द्यायचा.
झाडांची तोड
आपल्या भारत देशाकडे शंभर वर्षांपूर्वी अफाट संपत्ती होती. परंतु आज काही वर्षांपूर्वी औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे झाडांचे प्रमाण नष्ट होत चालले आहे.
मानव वृक्षांची तोड करून इमारती बांधण्यासाठी तसेच कारखाने वाढवून सिमेंटचे जंगल उभे करत आहे. जंगल तोड होत असल्यामुळे जंगलांचा नाश होत आहे. तसेच जमीन खराब होत आहे.
हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वानी जास्तीत – जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. नुसती झाडे लावून फायदा नाही तर त्यांचे जतन केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे.
निष्कर्ष
प्रत्येक माणसाला झाडे कुठल्या मातीत, वातावरणात वाढतात यांची काळजी घेतली पाहिजे. झाडांना काही वर्षे जपावे लागते. त्यानंतर झाडे एकदा का मोठी झालीत की, आपले स्वतःचे पोषण स्वतः करु लागतात.