Chemistry, asked by seemusalve2424, 5 months ago

RNA च्या प्रक्रियेला काय म्हणतात?​


GOKUultraINSTINCTkv9: from now onwards don't put ur pic in dp ok because this app is directly connected with google
seemusalve2424: okay
GOKUultraINSTINCTkv9: thank you
seemusalve2424: welcome
GOKUultraINSTINCTkv9: ':D

Answers

Answered by GOKUultraINSTINCTkv9
2

Explanation:

प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक अ‍ॅसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते. यात जो साखरेचा रेणू असतो तो असतो रायबोज, म्हणजे डिऑक्सिरायबोजला आणखी एक ऑक्सिजनचा अणू जोडलेला असतो. डीएनएची रचना दुपदरी असते तर आरएनए एकपदरी असतो व त्याचा तो एक पदर रायबोज साखर व फॉस्फेट ग्रुप यांच्या एकाआड एक रेणूंनी बनलेला असतो. यातही साखरेतील दुसऱ्या कार्बन अणूला नत्रयुक्त घटक जोडलेला असतो. आरएनएतील प्युरिन घटक अ‍ॅडेनीन व ग्वानीन असतात आणि पिरिमिडीन घटक असतात सायटोसिन आणि युरॅसिल. केंद्रकातील डीएनएचा साचा धरून आरएनएची घडण झालेली असते. त्यामुळे डीएनएतील माहितीची ती प्रतीक ठरते. केंद्रकातील डीएनए हा एकाच प्रकारचा असतो परंतु आरएनए मात्र तीन प्रकारचे असतात. डीएनएकडून माहिती घेऊन येणारा असतो त्याला दूत आरएनए म्हणतात. तसाच दुसरा आरएनए पेशीद्रवात असतो त्याला म्हणतात ‘ट्रान्सफर आरएनए’. या आरएनएचे कार्य म्हणजे दूत आरएनएवरील संदेशानुसार योग्य अमिनो आम्लाची निवड करून प्रथिनाच्या बांधणीसाठी त्याला वाहून नेणे आणि तिसऱ्या प्रकारचा आरएनए असतो तो ‘यबिझोमल आरएनए’. हा घटक दूत आरएनएवरील संदेश वाचून त्यानुसार प्रथिनाची बांधणी करत असतो.

जर डीएनएपासून आरएनएची प्रत तयार करताना घडणीत काही चूक घडली तर या चुकीच्या आरएनएकडून घडणारे प्रथिन चुकीचे असू शकते व त्यामुळे काही दोष निर्माण होतात. आपल्या शरीरातील विकरे, हॉरमोन्स, चेतापेशी, स्नायू या सर्वाच्या बांधणीत प्रथिनांचा मोठा सहभाग असतो. तसेच दोन पेशींतील निरोपांच्या देवाणघेवाणीतसुद्धा प्रथिने कार्यरत असतात. त्यामुळे जर आरएनए बनताना काही चूक घडले तर त्या चुकीमुळे शारीरिक प्रक्रियांत मोठे बदल घडू शकतात आणि आपल्याला काही व्याधींना तोंड द्यावे लागते.

Similar questions