road atmakatha in marathi eassy
Answers
Answer:
मध्यंतरी ‘तरुण भारत’ तसेच इतर वर्तमानपत्रांमध्ये नागपुरातील रस्त्यांबद्दल बरेच चर्चितचर्वण व छायाचित्रे येत होते. तेव्हापासून माझे व लेखकाचे हितगुज सुरू होते. मी लेखकाला विनंती केली की- माझी आत्मकथा तुमच्या लेखणीतून उतरते का बघा! म्हणजे सर्वांना माझ्या व्यथा कळतील.
मित्रांनो, माझा जन्म कधी झाला, हे जरी मला आठवत नसले, तरी तो रामायण-महाभारत घडण्याच्या आधी नक्कीच झाला. कारण राम माझ्या अंगावरूनच वनवासात गेले तर महाभारतासाठी माझाच वापर झाला. मला आठवते- माझ्या लहानपणी माझे नाव ‘पायवाट’ असे होते. अगदी पायी जाण्यापासून तर बैलगाडी, खेचर, घोडागाडी सुद्धा बिनभोबाट माझ्या अंगावरून जायची. पण मला कधी त्रास व्हायचा नाही, अगदी खाचखळगे असून सुद्धा! मी अगदी किर्रऽऽ घनदाट जंगलातून सुद्धा पसरलेलो होतो, ज्यावरून हिंस्त्र श्वापदेही फिरायचे, पण मला त्यांची कधी भीती वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबार्ई, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच अनेक रथी- महारथी, स्वातंत्र्य सैनिक देश प्रेमाखातर माझ्या अंगावरून स्वारी करून जायचे, याचा मला नितांत अभिमान वाटायचा.
माझ्या आजूबाजूला घनदाट झाडेझुडपे असल्याने पाऊस, उन्हापासून माझे संरक्षण व्हायचे. मी वयात यायला लागलो तसे माझे रूंपांतर डांबरीकरणामध्ये व्हायला लागले. जसे जसे रस्ते डांबरांनी काळेशार व्हायला लागले, तुम्हा सर्वांना माझ्यावर स्वारी करायला मजा वाटायची, पण काही काळ! कारण डांबरीकरणचे कंत्राट म.न.पा./न.पा./ग्रा.पं. घ्यायचे. त्यांना हे माहिती होते की डांबराचे व पाण्याचे वैर आहे. एकदा का डांबरी रस्त्यावर पाणी साचले की तिथे खड्डा पडलाच पाहिजे. तुम्ही मला कोसत कोसत, तुमची तसेच माझी हाडे खिळखिळी करत, माझ्यावर स्वारी करायचे. असे दोन-तीन वर्षे गेली की परत नवीन डांबराचा रस्ता, असे रहाटगाडगे सुरू होते. हे डांबरीकरण करताना हे कंत्राटदार एक काळजी घेतात की आजूबाजूची सर्व झाडे तोडुन टाकायची म्हणजे एकतर पावसाचे पाणी सरळ माझ्या उरावर पडेल वर उन्हाच्या झळांनी डांबर वितळून खड्डे निर्माण होतील.
आता मला सांगा मित्रांनो- यात माझा काय दोष ? मला तुम्ही प्रत्येक खड्यागणिक कोसत राहता. पण ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास होतो, तसाच मला पण होतो. तसेच मला अनुभव असेही आहेत की जसे रस्त्याचे डांबरीकरण झाले की लगेच केबल, इलेक्ट्रिक विभाग एखाद आठवड्यात तो रस्ता खोदायला घेतात. यावरून असे वाटते की संबंधित रस्ते बांधणी खाते व केबल इलेक्ट्रिक, पाईपलाईनकरिता मंजुरी देणारे विभाग आजूबाजूला आहेत आणि दोघांच्या संगनमताने हे रोजगार हमी योजनेचे कार्य अव्याहत चालू आहे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर-
सोमलवार निकालस हायस्कूल, खामला समोरचा रस्ता मध्येच खूप मोठा खड्डा खोडून अगदी शिस्तीत टेकडी उभारून बुजवला आहेत.
दीक्षाभूमी व माझी मेट्रोे यामध्ये गुळगुळीत रस्त्यावर सरळ रेषेत खोदून तसेच सोडून दिले आहेत.
शिवाजी चौक, स्वावलंबी नगर ते पडोळे चौक रस्त्यावरचा सुंदरसा खड्डा तुम्हाला गतिरोधकाची आठवण करून देतो.
मित्रांनो, आता हे झाले विविध खड्ड्यांचेे पवित्र कार्य, आता तुम्ही सर्व याला कसा हातभार लावता, हे बघा! जागोजागी असलेले गोठ्याचे मालक आपल्या गाई-म्हशींना याच रस्त्यावरून चरायला सोडतात त्यात भर म्हणून मोकाट गाई गुरे त्यांचा प्रतिनिधी रस्त्यावर करतात. तसेच माझ्या आजूबाजूला सुरू असलेले बांधकामाचे साहित्य माझ्या उरावर आणून टाकतात