Roads biography small essay in Marathi
Answers
Answer:
your imagination is better than ours...
kindly think and write...
Explanation:
मी रस्ता बोलतोय.
खूप दिवस झाले ह्या वाटे आलात नाही?
वाट पाहतोय मी तुमची.
होय, मी रस्ता बोलतोय!
तोच रस्ता जो तुमचा गावाकडे जातो. दिसला नाही खूप दिवस इथे. लहानपणी तर दर सुट्टीत गावी येण्याची उत्सुकता असायची तुमच्यात. आता जसे मोठे झालात तास वेळ कमी मिळतो तुम्हाला. कधी कधी सुट्टी नाही मिळत. समजू शकतो मी!
पण आठवतं तुम्हाला?
लहानपणी गाणी म्हणत पूर्ण वेळ तुम्ही गावाला यायचात. तासांचा पल्ला मिनटांसारखा वाटायचा. आजी आजोबांना भेटायला तुम्ही उतावीळ व्हायचात. माझा कंटाळाही यायचा तुम्हाला.
आधी मी कच्चा होतो, पण आता डांबरीकरण झालाय बरं का! शहरांतील रस्त्यांचे कौतुक वाटतं मला. कसे डांबराचे गरम चटके सहन करतात कोणास ठाऊक. मला तर खूप त्रास झालेला. पण आता सवय होऊ लागली आहे. वर्षातुन २ वेळा तरी होते माझी दुरुस्ती. आता काही वाटत नाही. ऐकलंय कि तुम्ही सुद्धा मोठी गाडी घेतली आहे. आता तरी गावी या, मी आता पक्का रास्ता झालोय. ह्या वाट बघणाऱ्या डोळ्यांना थोडा थंडावा द्या?
शिमगा येतोय! येतंय ना?