Computer Science, asked by rishabhlaxkar, 6 months ago

rose chitra varnan in marathi​

Answers

Answered by harshad6022
2

Explanation:

हरवलेपणातून बहरलेली आणि मानाच्या ‘नोबेल’र्पयत घेऊन गेलेली लुईस ग्लूकची कविता काय सांगते?

साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करायचा असेल तर त्या साहित्यामध्ये सामाजिक आशय असलाच पाहिजे, असं आजवरचं चित्र होतं. आपल्या चिमुकल्या अनुभवाच्या तळ्यातील वेदनांना शब्दरूप देणा-या कवितेला सर्वोच्च जागतिक पुरस्काराच्या प्रशस्तीची पावती मिळणे ही फार दुरापास्त बाब आहे. म्हणूनच प्रचंड मोठा जागतिक कॅनव्हास वगैरे न घेता आणि विद्रोहाच्या कोलाहलात सामील न होता शांत व संयतपणे आपल्या घराच्या अंगणात घडणा-या गोष्टींचा वैयक्तिक अनुभव अत्यंत तरलपणे शब्दबद्ध करणा-या लुईस ग्लुक या श्वेतवर्णीय कवयित्रीला यंदाचा नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा भावकवितांवर नितांत प्रेम करणा-या सर्वच वाचकांना सुखद धक्का बसला. नोबेल पारितोषिकाच्या 112 वर्षाच्या इतिहासात कवितेच्या वाटय़ाला नोबेलचे भाग्य क्वचितच येतं . ते यावर्षी या ख्यातनाम अमेरिकन कवयित्रीला मिळालं.मध्यमवर्गीय स्रीच्या दु:खाकडे, वेदनेकडे, तिच्या चौकटीतील जगण्याकडे बघण्याचं भान लुईसची कविता देते. कौटुंबिक जीवनात पेलावी लागणारी आव्हानं , वृद्धत्वाच्या चाहुलीने येणा-या संध्याछाया, हातातून निसटून गेलेले तारुण्याचे हसरे क्षण आणि दाटून येणा-या पावसाळी नभासारखे भरून राहिलेले एकटेपण या विषयांना तिच्या कविता स्पर्श करून जातात. ‘विलक्षण साधेपणानं आविष्कृत होणा-या  कौटुंबिक व खास माजघरातील गंध घेऊन येणा-या  कविता’ असा आवजरून उल्लेख नोबेल पारितोषिक समितीनं केलेला आहे.झुळझुळणा-या झ-यासारखा स्वच्छ स्फटीक स्वर लुईसच्या कवितेत आहे. ठाम विचार, रेशमी चिमटे काढत जाणारी शैली, नर्मविनोद आणि आसपास घडणा-या साध्या घटितांमागील व्यावहारिकता याच्या स्पष्ट नोंदी तिच्या कवितेत आहेत. तिची विलक्षण बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या खोलवर तळाशी जाऊन व्यक्त केलेल्या भावभावना पुन्हा पुन्हा वाचकाला तिच्या कवितेकडे खेचून नेतात. साध्या साध्या कौटुंबिक सुख-दु:खाच्या घटनांना तिनं काव्यरूप दिलं. आपल्या बालपणीच्या आणि तारुण्यातील घटनांना तिनं ग्रीक मिथकांची जोड दिली. तिच्या लहानपणी तिला झोपवताना तिचे आई-वडील तिला ग्रीक पुराणकथा सांगत असत. आपल्या दैनंदिन जगण्याच्या परिप्रेक्षातून तिनं या सर्व कथांकडे पाहिलं आणि या दोन्हीचे सुंदर फ्यूजन तिच्या कवितेमध्ये अवतरलं.लुईसचा जन्म न्यू यॉर्कचा. तिचे वडील डॅनिअल ग्लुक यांचं किराणा मालाचं दुकान होतं, तर आई गृहिणी होती. बाईसाहेबांनी वयाच्या पाचव्या वर्षीच पहिली कविता लिहिली होती.वेदना आणि दु:ख हे मात्र लुईसच्या भाळी लहानपणापासूनच लिहिलेले होते. शाळेत असतानाच तिला अग्निमांद्य या आजाराचा सामना करावा लागल्यानं शाळा सोडून घरी बसावं लागलं. मृत्यूला स्पर्श करून आल्यानं तिची कविता अजूनच घनगंभीर झाली. तिनं कोलंबिया विद्यापीठात कवितांच्या कार्यशाळांसाठी स्वत:चं नाव नोंदवलं होतं; पण अखेरीस कुठलीही पदवी न घेताच तिला कोलंबिया विद्यापीठातून बाहेर पडावं लागलं. त्या काळात कारकुनी काम करून तिनं स्वत:चा उदरनिर्वाह केला. 1967 मध्ये तिने चार्लस हेरटसशी विवाह केला आणि 1968 मध्ये घटस्फोट! निकटच्या व्यक्तीशी असलेलं संजीवक नातं मरून जातं तेव्हा त्यातून येणारी प्रचंड निराशा, खिन्नता आणि एकाकीपण आणि सर्वकाही झाकोळून जाणं ..बस्स हेच उमटले लुईसच्या कवितेत!‘फर्स्ट  बॉर्न’ हा पहिला आणि ‘द हाऊस ऑन माशर्लड’ हा दुसरा. या तिच्या दोन्ही कवितासंग्रहांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. तिनं कवितांच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. आज लुईस येल विद्यापीठात  कविता शिकवणारी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. कविता ही अनुभवण्याची गोष्ट आहे, कविता शिकवणं म्हणजे तिचं विच्छेदन करून तिच्यातील सौंदर्य नष्ट करणं वगैरे गोष्टींना पुन्हा सणसणीत उत्तर देण्याचं काम लुईसनं आयुष्यभर इतरांना कविता, सर्जनशील लिखाण शिकवून केलेलं आहे.

Similar questions