Art, asked by devkarnagnath582, 14 hours ago

साडी हा स्त्रीयांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे असे तुम्हाला वाटते का?​

Answers

Answered by Shriwallabh7262
3

Explanation:

खरं तर प्रत्येक स्त्रीचा साडी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो .अगदी लहान मुलीपासून ते वृद्ध आजी पर्यंत प्रत्येकीला साडी आवडते क्वचित एखादी च असते जिला साडी आवडत नाही .

साडी आणि स्त्री च एक अतूट नात असतं ,अगदी लहानपणी बाळाला आजीच्या जुन्या साड्यांची दुपटे शिवून त्यातून झालेला आजीचा ,आईचा मऊ स्पर्श ,मग खेळताना आईची ओढणी किंवा स्कार्फ घेऊन घातलेली खोटी खोटी साडी ,खेलभांडे खेळताना आई होऊन घातलेली साडी ,

शाळेच्या कार्यक्रमात राधा होऊन घातलेली साडी मग हळूहळू कळायला लागलं की मी नाही हा घालणार साडी ,मला अजिबात आवडत नाही साडी घालायला असे म्हणणारी लेक कधी मोठी होते ते आईला कळत ही नाही.

दहावीच्या सेंड ऑफ साठी वर्गातल्या मुली शाळेत साडी घालून यायचं ठरवतात आणि मग प्रत्येकीच्या घरी लगबग सुरू होते ,कोणती साडी घालू ,आईकडे जास्त नवीन पॅटर्न ची साडी च नाही ,मग शेजारी पाजारी नवीन लग्न झालेली ताई ,वहिनी असते तिच्या कडे जाऊन हक्काने तिची साडी घरी आणते ,( आधी शेजारी म्हणजे कुटुंबाचा भाग वाटायचे त्यामुळे साडी घेणारी आणि देणारी दोघींना खूप आनंद होत असे ,मी या गोष्टीचा लहानपणी खूपदा अनुभव घेतला आहे )

आणि मग साडीवर ब्लाऊज मशीन मारून मापाचा करणे ,त्यावर मॅचींग बांगड्या ,ज्वेलरी याची दोन दिवस आधी शोधा शोध करून सगळी तयारी करणे ,सेंड ऑफ चा दिवस येताच खूप गडबड करून आईसह अजुन एकदोन काकू ताई ,मदतीला येऊन आयुष्यातील पहिली साडी साग्रसंगीत घालून स्वतः ला आरशात पाहणे,खूप छान दिसते ग ! अस सगळ्यांनी म्हणताच गोड लाजणे ,आईच्या डोळ्यात न कळत दोन आसव ओघळणे ,बाबा तर तू नको नेसू साडी मोठी झाली अस वाटत अस म्हणणे ,रोज शाळेचा गणवेश आणि दोन वेण्या घालून येणाऱ्या आपल्याच विद्यार्थिनी साडीत गोजिरवाण्या दिसतात म्हणून शिक्षिकानी केलेलं कौतुक मस्त वाटत आणि मग शाळेत सेंड ऑफ होऊन दहा वीस फोटो काढून पटकन घरी जाऊ ग ,सारखा पदर आणि साडी नीट का हे पाहून तिचा जीव अगदी मेटकुटीस येतो ,बायका कायम साड्या कशा कॅरी करतात अशी चर्चा करत ती घरी पोचून पटकन टी शर्ट आणि पँट अडकवते,परत काही आपण साडी घालायची नाही अस मनाशी ठरवून टाकते .आई तू कशी काय कायम साडी घालू शकते ? आई तिच्या या प्रश्नावर गोड हसून म्हणते कळेल हो तुला !

पुढे तीच शिक्षण झपाट्याने सुरू असते ,अभ्यास ,सबमिशन , प्रॅक्टिकल ,ट्रेक ,यातच भर भर दिवस वर्ष काळा प्रमाणे पुढे सरकतात,आता आईच्या कपाटात हिच्या पसंतीच्या वेगवेगळ्या साड्या येऊन बसतात ,आईला साडी घ्यायला ही आवडीने जाते ,नेहमी आपल्या पसंतीचा ड्रेस घेऊन देणारी आई स्वतः कायम साध्याच साड्या घेते हे पाहून लेक बाबाला म्हणून आई साठी भारी साड्या खरेदी करते त्यावर आई रागावते ,खूप भारी साडी आहे म्हणून आई किती जपून वापरते हे पाहून तिला हसू येत आणि आईला ती म्हणते आई घाल ग तू साड्या मी जॉब ला लागले ना की तुला खूप साड्या घेईल तिच्या या वाक्याने आई मनोमन सुखावते ,कॉलेज मध्ये कधीतरी आणि अगदी एखाद वेळी सणाला आई मागे लागते म्हणून साडी घालते ,साडी आता तिला आवडू लागते पण स्वतः साठी साडी घ्यायला घाबरते ,ती नोकरी ला लागली की आईसाठी खूप छान साडी घेते ,मग आई एकदिवस हट्टाने तिला घेऊन दुकानात जाते आणि साडी घ्यायला लावते ,अग आता लग्नाचं वय झाल ,तुझ्या स्वत: च्या साड्या घेऊ ,तुला आवडतील त्या घे अस म्हणत बळजबरी आई एकदोन साड्या घ्यायला लावते ,घरी येऊन ती तोंड फुगवून बसते ,आईशी भांड भांड भांडते ,मला नाही करायचं इतक्यात लग्न म्हणून गोंधळ घालते ,आई प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवत म्हणते , आता फक्त बघू तुला मुलगा आवडला तरच नाहीतर नाही हा !

दुकानात आवडणारी असणारी साडी दाखवण्याचा कार्यक्रमात तिला अजिबात आवडत नाही ,खूप राग येतो साडीचा ,त्या रागात मुलगा कसा आहे हे बघायचं लक्षात नाही येत ,आणि तिकडून निरोप येतो मुलगी पसंत आहे ,मग परत भेट गाठ होते ,लग्नाला तयार नसणारी आता जोमाने लग्न खरेदीला लागते ,साडी बरोबरच बघितलेल्या मुलाच्या प्रेमात पडते ,तुला साडी छान दिसते ही त्याची प्रतिक्रिया ऐकून ती साड्यांच्या प्रेमात पडू लागते . .

Similar questions