संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?
Answers
सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?
संगणकाची वैशिष्ट्ये
१. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
२. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्य, विश्वासार्हता दिसून येते.
७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.
८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता
संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटर, साधन म्हणून वापर करता येतो.
१. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना गुणपत्रिका तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत मदत करतो.
२. निरनिराळ्या कार्यालयांमध्ये हा त्यांची कामे सोपी व लवकर करण्यास मदत करतो.
३. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान मदत करू शकतो.
४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.
५. शिक्षणात संगणकाचा वापर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणकामुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज संगणकाचा वापर होत नाही असे जवळपास एकही क्षेत्र नाही.
६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.
७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.
८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.
९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.
१०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययनअनुभव देता येतो.
११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
१२. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.
१३. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात आल्या आहे.
1)संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला.त्यामध्ये व्हॉल्वज वापरले होते. हे व्हॉल्वज आकाराने मोठे होतेव त्यांना वीजही खूप लागायची त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि बऱ्याच वेळा संगणक बंद पडत असे.
2)संगणकाची दुसरी पिढी-1959ते1993दरम्यानची ट्रान्झिस्टरस.
3)संगणकाची तिसरी पिढी-1964ते1971इंटिग्रेटेड सर्किट्स.
4)संगणकाची चौथी पिढी -1972 ते 2010 मायक्रोप्रोसेसर.
5) आजचे संगणक हे संगणकाच्या पाचव्या पिढीतले संगणक आहे.
संगणकाचे कार्य जास्त वेगाने चालते .
संगणकामुळे वेळ वाचतो.
माहिती लगेच मिळते शोधाशोध करावी लागत नाही.
धन्यवाद...