India Languages, asked by divya605, 10 months ago

संगणक काळाची गरज मराठी निबंध ..plz write 20 to25 line​

Answers

Answered by lavpratapsingh20
193

Answer:

Explanation:

संगणक काळाची गरज बनली आहे...

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे! २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे! संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे!आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो! संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत! आपल्या दैनदिन व्यवहारात,रिजवेशन, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे

Answered by ItsShree44
48

Answer:

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. संगणकाचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला. चार्लस् बॅबेज हा संगणकाचा जन्मदाता. इ. स. १८३२ मध्ये म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेले हे बाळ भलेभक्कम आणि मोठे होते. त्याची कार्यक्षमताही मर्यादित होती. पण हा गुणी बाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा आकार अधिकाधिक लहान होत गेला आणि कर्तृत्वाच्या कक्षा मात्र सतत रुंदावतच गेल्या. म्हणून तर आज हा संगणक आपले अधिराज्य सर्वत्र स्थापू शकला आहे. एकविसावे शतक हे 'ज्ञानयुग' आहे आणि या ज्ञानयुगाचा कळस म्हणजे संगणक !

आज या संगणकाला 'अशक्य' हा शब्द माहीत नाही. एके काळी संगणक ही फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी होती. पण आज तो जनसामान्यांचा सेवेकरी झाला आहे. आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या प्रवासातील रेल्वेच्या वा विमानाच्या तिकिटांचे आरक्षण संगणक करतो. आपल्या घरात दरमहिन्याला येणारी विजेची व दूरध्वनीची बिले, विम्याचा हप्ता भरण्याची सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो. संगणकाने सर्व कामे सोपी, सुलभ आणि शिस्तीची केली आहेत. मोठमोठ्या संस्था, कारखाने, कचेऱ्या येथील बिले तयार करण्याची कामे संगणक करतात. शालान्त परीक्षा आणि इतर अनेक मोठमोठ्या परीक्षांचे निकाल संगणक तयार करतो. मोठमोठी पुस्तके, ग्रंथ अगदी सहजगत्या चुटकीसरशी संगणकाच्या साहाय्याने छापले जातात. बँका, विमा कंपन्या, शेअर्स कचेयांमधील हिशेब संगणक क्षणात बिनचूक करतात.

सध्याच्या विज्ञानयुगात सतत संशोधन चालू असते. या संशोधनाला संगणक मोठे साहाय्य करतो. या युगातील अंतराळविज्ञानाला संगणकाचा आधार लाभला आहे. अंतराळात उपग्रह सोडण्यास संगणकाने मदत केली आहे. हवामानाचा अंदाज, दूरदर्शनवरील चित्रदर्शन अशी किती कामे सांगावी या संगणकाची ! इंटरनेटसारख्या चमत्काराने तर जग जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे. आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शापासून दूर राहू शकत नाही, इतके या संगणकाचे माहात्म्य वाढले आहे.

असे या संगणकाचे अधिराज्य सर्वत्र आहे. म्हणून या संगणकाचे आपण गुलाम झालो आहोत काय? असा प्रश्न पडतो. पण विचारांती या प्रश्नातील फोलपणा लक्षात येतो. एक गोष्ट नक्की की, या संगणकाचा निर्माता माणूस आहे. माणूसच संगणकाला माहिती व आज्ञावली देतो. अंतिमतः या अधिराज्याचा दूरस्थ नियंत्रक माणूसच आहे !!

Similar questions