संगणक महत्व, इतिहास, शिक्षण माहिती मराठी निबंध, भाषण, लेख
Answers
Answer:
No proper question please post it in a proper way
Answer: संगणक हे एक असे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे बहुतेक क्षेत्रात वापरले जाते जेथे मानवी हस्तक्षेपाला मर्यादा असते. म्हणूनच या युगाला आयटीचे म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते.
आता आपण संगणकाशिवाय जगाची कल्पना करू शकत नाही. आजकाल संगणक खूप महत्वाचा झाला आहे कारण तो खूप अचूक, वेगवान आहे आणि बरीच कामे सहजपणे साध्य करू शकतो.
संगणक कर्मचा-यांना कार्यक्षम आणि उत्पादक बनवून व्यवसायांना मदत करू शकतात आणि कोणत्याही व्यवसाय किंवा कार्यालयाचा मौल्यवान वेळ वाचवू शकतात. शाळांमधील संगणकाच्या मदतीने दृकश्राव्य माध्यमातून मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होत आहे. उच्च शिक्षण संस्थांमधील संगणक प्राध्यापकांना आणि संशोधकांना त्यांचे कार्य अतिशय वेगवान, कार्यक्षम आणि चांगल्या मार्गाने करण्यासाठी आणि हे ज्ञान इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात.
संगणक अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ; रेल्वे, बँकिंग, वीज, टेलिफोन विभाग इत्यादी. संगणकाचा उपयोग वैद्यकशास्त्रात रोगांचे निदान लवकर आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी केला जातो. सर्व प्रशासकीय प्रणाली - खाजगी किंवा सार्वजनिक आता संगणक वापरत आहेत आणि हे चित्र जगाच्या प्रत्येक भागात दिसून येत आहे.
Explanation: