Environmental Sciences, asked by maivishshaikh, 9 months ago

१संगणक शाप की वरदान​

Answers

Answered by s04011sriram
1

Explanation:

मिलिंद कुलकर्णी

शालेय जीवनात बहुतेक प्रत्येकाने या विषयावर निबंध लिहिला असेल, त्याविषयी त्याची वैयक्तिक मते मनमोकळेपणाने मांडली असली तरी थेट निष्कर्षाला कोणीही पोहोचले नसेल. मध्यममार्ग साधावा, असेच त्याने सुचविलेले असेल. तो विषय आहे, ‘विज्ञान : शाप की वरदान’. खरंय की, नाही. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच या विषयाचे आहे. विज्ञानाला तुम्ही एकदम शाप म्हणू शकत नाही. वरदान निश्चित आहे, पण काही वैज्ञानिक शोधानंतर झालेल्या यांत्रिक क्रांतीने रोजगार कमी झाले. सुविधा वाढल्या; पण माणूस आळशी बनला. त्याच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हे वरदान म्हणावे काय? त्यामुळे शेवटी हेच म्हणावे लागते, की विज्ञानाचा उपयोग हा तारतम्याने करायला हवा. माणसाने यंत्र बनविले आहे, यंत्राने माणसाला बनविलेले नाही. त्यामुळे यंत्राने माणसाच्या बुध्दी

Answered by YashodharPalav5109
1

Answer:

अत्याधुनिक संगणक हा विज्ञानाचा चमत्कार आहे. पण संगणकाचा वापर हानिकारक ठरणार की लाभदायक? संगणक शाप ठरेल की वरदान? हे प्रश्न बहुचर्चित ठरले आहेत. एक संगणक साधारण पंधरा माणसांचे काम करतो. संगणकाच्या साहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एकावेळी साधारणतः पन्नास माणसांचे काम करतो आणि तेही कमी वेळात व अगदी अचूक.

संगणक अवकाशयाने (spaceship) नियंत्रित करू शकतो. पाणबुड्यांवर नियंत्रण करतो आणि जमिनीवरील जी जी कामे मानव करतो ती सर्व कामे तो करतो. सध्या प्रवासी वाहनांत जागांचे आरक्षण करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या परीक्षांचे जटिल स्वरूपाचे काम करण्यासाठी संगणकाला वेठीला धरले आहे. आता बँकांमध्येही संगणकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यास सुरवात झाली आहे. जेथे विषारी वायूंचा धोका आहे, तिथे संगणकनियंत्रित यंत्रमानवाचा (रोबॉट) उपयोग करून प्राणहानी टळू शकते.

संगणकामुळे कामातील चुका टाळता येतात. त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते. अर्थातच वस्तू कमी दरात विकता येते. या साऱ्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील मालाची मागणी वाढते व त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ होते. संगणक माणसाला बाजूला सारून काम करतो. त्यामुळे संगणकाचा वापर हा शापच आहे असे वाटू लागते. आधीच लोकसंख्या भरपूर, त्यात रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत; अशा परिस्थितीत संगणक म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरणार नाही का?

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच संगणकाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. अणुबॉम्बने जपानचा सर्वनाश केला. पण त्याच अणुशक्तीचा आपण विकासासाठी उपयोग करून घेत आहोत. नांगरणी, शिंपणी, मळणी इत्यादींसाठी मोठमोठी अवजारे आज आपण वापरतो. ही अवजारे प्रथम वापरात आली त्यावेळेस बेकारीचे असेच संकट मजुरांवर आले होते, त्याला आपण तोंड दिलेच. तसेच संगणकाचा उपयोग केल्यावर निर्माण होणाऱ्या बेरोजगारांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल.

संगणकाच्या उपयोगाने आर्थिक बचत खूप होईल. या आर्थिक बळाचा उपयोग करून अधिकाधिक उदयोगधंदे निर्माण करता येईल. संगणक तयार करण्यासाठी, तसेच संगणकातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी, संगणकाला लागणारे प्रोग्रॅम्स बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षित माणसांची आवश्यकता असते. बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन या कामात त्यांना गुंतवता येईल.

संगणक विज्ञानाचे एक अपत्य आहे. मानवाला विज्ञानाने दिलेले एक प्रभावी साधन आहे. तेव्हा संगणकाचा वापर मानवासाठी जास्तीत जास्त सुखसुविधा निर्माण करण्याकरता केल्यास, संगणक हे मानवाला लाभलेले वरदान ठरेल यात शंका नाही. आज भारतीय तरुण संगणकतज्ज्ञ अमेरिकेतील 'सायबर लॉबी' सांभाळत आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आवश्यकच आहे. मग सांगा, संगणक हा वरदान नाही का? संगणकासाठी माणूस नसून माणसासाठी संगणक आहे, हे लक्षात ठेवले म्हणजे संगणकाची धास्तीच उरणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Similar questions