Environmental Sciences, asked by pruthviraj1212, 1 year ago

संगणक शाप की वरदान मराठी निबंध​

Answers

Answered by halamadrid
36

◆◆संगणक शाप की वरदान◆◆

संगणकाचे वेगवेगळे फायदे आहेत.संगणकामुळे आपल्याला आपले काम व अभ्यास वेगाने व अचूकपणे करता येते. इंटरनेट सुविधेमुळे संगणकाद्वारे आपल्याला इतरांशी संपर्क साधता येतो,वीडियो कॉलमुळे लोकांना प्रत्यक्षात पाहता येते.

संगणकामध्ये आपण वेगवेगळे चित्रपट पाहू शकतो,गाणी ऐकू शकतो.संगणकामुळे आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळते.

फायद्यांसोबत संगणकाचे तोटेदेखील आहेत.

संगणकाचा अतिवापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो,तसेच इतर आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात

संगणकावर काही लोक गेम्स खेळण्यात किंवा इतर कामांमध्ये वेळ घालवतात,त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी वेळ मिळत नाही.काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात.

अशा प्रकारे,संगणकाचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत.त्याचा शाप म्हणून वापर करायचा किंवा वरदान म्हणून हे, आपल्यावर असते.

Answered by Anonymous
24

Answer:

आजचे युग हे 'संगणकाचे युग' आहे हे सर्वांनी मान्य केले आहे. त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानेल, असे वाटत नाही. पण ज्यावेळी आपल्याला प्रथम संगणकाची ओळख झाली, तेव्हा मात्र लोकांना 'संगणक' हे मोठे संकट वाटले होते. एक संगणक अनेकांची कामे करतो. त्यामुळे एखादया कार्यालयात एक संगणक आणला, तर अनेकजण बेकार होतील, अशीच भीती सर्वांना वाटत होती. प्रारंभी निर्माण झालेली ही भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्ट दाखवता येणार नाही. उलट, संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत. संगणकाचा सर्वांत मोठा गुण म्हणजे अत्यंत अचूक आणि प्रचंड वेगात काम करण्याची अफाट क्षमता. या गुणाचा सर्वत्र उपयोग होत आहे. अगदी गुंतागुंतीच्या गणितांपासून ते छपाईपर्यंत सर्व कामे संगणक सहजपणे करू शकतो. त्यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे. संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठेवता येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिळवता येते. यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर पटापट निर्णय घेता येतात. कामे झटझट होतात. साहजिकच वेगाने

प्रगती होते.

इंटरनेटमुळे हे विशाल जग अगदी छोटे बनले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधता येतो. याचा सर्व क्षेत्रांत अतोनात फायदा होत आहे. इंटरनेटवरील माहितीच्या महाखजिन्यातून कोणत्याही विषयावरील अत्यंत अदययावत माहिती मिळते. माणसे एकमेकाला पत्रे पाठवू शकतात, बोलू शकतात. नैसर्गिक आपत्ती वा गुंतागुंतीचे आजारपण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबतीत मदत मागवता येते वा पाठवता येते. त्यामुळे असंख्य लोकांची संकटातून मुक्तता होते. प्राणही वाचवता येतात. घरबसल्या नाटक-सिनेमांची किंवा रेल्वे-विमानाची तिकिटे आरक्षित करता येतात. कोणत्याही बँकेत आपले पैसे असले, तरी जगातील कोणत्याही 'ए. टी. एम्.' मधून पैसे काढता येतात.

सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेत जिंकायचे असेल तर संगणक टाळता येणार नाही. तसेच, बेकारीबाबत आपली कल्पनाच चुकीची आहे. आता आपण पाहतो की संगणकामुळे कितीतरी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, व्यवसाय वाढले आहेत. पूर्वीच्या नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. पण त्यांच्या कितीतरी पटीने नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. संगणकाबाबत तर आपण जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. अशा या गुणी संगणकाला शाप कोण म्हणेल?

Similar questions