India Languages, asked by harshrsalve, 8 months ago

संगणक शाप की वरदान मराठी निबंध

Answers

Answered by prathamesh6574
2

संगणक शाप की वरदान प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असते

Answered by varadad25
59

Answer:

संगणक : विज्ञानाची अमूल्य देणगी

Explanation:

संगणक किंवा त्यालाच आपण दररोज कॉम्प्युटर म्हणतो हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. संगणकामुळे सारी अशक्य वाटणारी कामे शक्य झाली आहेत व पूर्णही होत आहेत. संगणकाचा प्रत्येक क्षेत्रात उपयोग होतो. शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी संगणक महत्त्वाची भूमिका बजावतो.

संगणकाद्वारे संवाद वाढत असून संपूर्ण जग जवळ येत आहे. आपण व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा त्यालाच आपण चित्रफीत परिषद म्हणू शकतो. या प्रणालीचा खूप उपयोग होत आहे. संगणकामुळे संदेशवहन अधिक जलद झाले आहे.

असा हा जादूचा दिवा महान शास्त्रज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी शोधून काढला. पूर्वी संगणक खूप मोठ्या आकाराचा होता. मात्र, कालांतराने त्यात बदल होत गेले आणि आता अगदी तळहातावर बसणारा संगणक किंवा टॅबलेट अस्तित्वात आला आहे.

अशा प्रकारे, संगणक ही खरोखरच विज्ञानाने या मानवजातीला दिलेली अमूल्य देणगीच आहे!

Similar questions