Hindi, asked by cacoon6029, 1 day ago

सागरी लाटानापासून विजनिर्मिती कशी केली जाते

Answers

Answered by shivamgurav22
0

Answer:

पृथ्वीवरील जवळजवळ ७० – ७५% क्षेत्रावर पाणी आहे. यांत पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी इ. महासागर तसेच लहान मोठे समुद्र आहेत. या सागरसंपत्तीमध्ये दडलेल्या ऊर्जेबद्दल प्रामुख्याने दोन-तेन रूपांत शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे.

भरती-ओहोटी : पृथ्वीतलावरील पाण्यावर सूर्य आणि चंद्र यांच्या गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव पडत असल्याने सागरातील पाण्याला भरती-ओहोटीच्या चक्राचा अनुभव अव्याहतपणे येत असतो. भरतीच्या वेळी पाण्याची स्थितिज ऊर्जा वाढलेली असते. ओहोटी वळल्यावर पाणी कमी होत असताना या स्थितिज ऊर्जेचा वापर करून पाहिजे असलेल्या प्रकारची ऊर्जानिर्मिती करता येते. भरती-ओहोटीच्या पातळींमधील फरक जितका अधिक, तितक्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती अधिक होण्याची शक्यता असते. भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या केलेल्या एका सर्वेक्षणात गुजरातच्या खंबायत आखातात भरती-ओहोटीमधील फरक सर्वांत अधिक आढळला.

सागरी लाटा

समुद्रकिनाऱ्यावर रात्रंदिवस लाटा एकीपाठोपाठ एक येत असतात. या लाटा म्हणजे वेगाने वाहणारे पाणीच असते. लाटांमध्ये असलेली ही गतिज ऊर्जा वापरून वीज निर्माण करण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या किनाऱ्यावर लाटांची उंची आणि वारंवारता अधिक, तितकी तेथील लाटांपासून मिळू शकणारी ऊर्जाही अधिक असते. अशा जोरदार लाटांचा शोध घेऊन त्या ठिकाणी विद्युत् जनित्रे बसविल्यास किफायतशीररीत्या वीज निर्माण होऊ शकते. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित काही प्रायोगिक जनित्रे केरळ राज्याच्या अरबी समुद्रकिनाऱ्यावर तिरूअनंतपुरमजवळ विझिज्जम येथे कार्यंवित आहेत.

महासागरी उष्णता: सागरी औष्णिक विषमतेवर आधारित ऊर्जानिर्मिती. महासागरातील पृष्ठभागावर सूर्याच्या उन्हात वर्षाव दिवसभर होतो, तेव्हा ह्या पाण्यात औष्णिक ऊर्जा शोषली जाऊन पाण्याचे तापमान वाढते. या तुलनेत सागरात जसे खोल जावे, तसे पाण्याचे तापमान कमी असलेले आढळते. समुद्राच्या खोल पाण्यात मंच (प्लॅटफॉर्म) उभे करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्याचा आधार घेऊन पृष्ठभागाजवळच्या कोमट पाण्यात शोषलेली ऊर्जा त्यामधून काढून घेऊन विद्युत् ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. हा भविष्यातील एक लक्षणीय शक्ती-उदगम ठरेल.

Explanation:

I hope it helps you plz mark me as Brainliest...

Similar questions