सागरी मार्गाने भारतात पश्चिमी किनारे और पहेली पहेली पोर्तुगीज खलासी कौन
Answers
Answer:
वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ.स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ.स. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. इ.स. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोर व तिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. इ.स. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर इ.स. १९६१ सालातील डिसेंबरात गोवा, दीव व दमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता इ.स. १९७५ साली मिळाली.