४)सागरजलाच्या क्षारलेत विभिन्नता दिसून येते.
Answers
Answer:
सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४°से. असते. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४°से. पर्यंत च कमी होते, त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. विषुववृत्ता जवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो , तर ध्रुवीय प्रदेशात, तापमानातील फरक कमी असतो .भूवेष्टित समुद्र व खुल्या सागरजलाच्या तापमानांत भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्रजलाचे तापमान खुल्या समुद्रजलापेक्षा जास्त असते.अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागात असते.