सिंह आणि अंदिर कथालेखन
Answers
सिंह आणि उंदीर
उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तेथे त्यास उंदरांनी फार त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन, त्याने पंजात एक उंदीर धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असता, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरड ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ अस. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.
तात्पर्य:- जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतील.
❤❤ANSWER❤❤
एक दिवस जंगलाचा राजा सिंह त्याच्या गुहेमध्ये झोपला होता तेंव्हा एक उपद्व्यापी उंदीर काही कारणाशिवाय इकडून तिकडे उगाच उड्या मारत होता. असाच खेळताखेळता तो सिंहाच्या पंजाच्या आणि त्याच्या नाकावरुन उड्या मारत असता सिंहाची झोप मोडली. उठल्या बरोबर त्या बलवान राजाने एका झटक्यात त्या छोट्या उंदराला आपल्या पंजात पकडले. त्या पोलादी वज्र मूठीत अडकल्याबरोबर उंदीरमामाची घाबरगुंडी उडाली. भितीने कासावीस होऊन तो छोटा जीव त्या महाकाय राजाची गयावया करु लागला. सिंह एका क्षणात त्या उंदराला यमसदनी पाठवणार इतक्यात त्याला उंदराची प्रार्थना ऐकू आली.
"कृपया, मला मारु नका" उंदीर म्हणाला "ह्या वेळेस मला क्षमा करा, हे महाराज" "मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही, आणि एक दिवस कोण जाणे मी तुमच्या उपकाराची परतफेड करीन"
हे ऐकून सिंह खोखो हसु लागला. त्या छोट्या उंदराची दयनीय अवस्था आणि त्यात त्याचे हे बोलणे ऐकून त्याची चांगली करमणूक झाली. सिंह म्हणाला "तु ऐवठासा छोटासा प्राणी आणि माझ्या सारख्या सर्व शक्तीमान प्राण्यांच्या राजाला काय मदत करणार?"
"महाराज" उंदीर म्हणाला "मला मारुन तरी तुमचा काही फायदा होणार नाही. मला मोठ्या मनाने क्षमा केलीत तर मी भविष्यात कधीतरी तुमच्या उपयोगी पडेन"
सिंहाला त्या उंदराची गंमत वाटली. हा पिटुकला जीव माझ्या काय उपयोगी पडणार परंतू ह्याला मारुन तरी काय फायदा ह्या विचाराने त्याने त्या उंदराला सोडून दिले.
ह्या घटनेला थोडे दिवस उलटून गेले. ऐक दिवस तो जंगलाचा राजा भक्ष्य शोधित जंगलात फिरत होता आणि अचानक शिकार्यांनी त्याच्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकला. अडकल्याबरोबर त्याने सुटण्याची खुप धडपड सुरु केली आणि मोठ्यामोठ्याने गर्जना करु लागला. त्याच्या गर्जनांनी सर्व जंगल दणाणून गेले. त्या छोट्या उंदराने पण त्या गर्जना ऐकल्या आणि आपल्या प्राणदात्याचा आवाज ओळखला. ताबडतोब उंदीर आवाजाच्या दिशेने पळाला आणि ज्या ठिकाणी सिंह अडकला होता त्या ठिकाणी पोहचला.
दोरखंडाच्या त्या जाळ्यात अडकलेल्या सिंहाला तो उंदीर म्हणाला "हे राजाधिराज, तुम्ही मला ओळखले नसेन पण मी तोच उंदीर आहे ज्याला ऐक दिवस तुम्ही प्राणदान दिले होतेत" "त्या वेळेस मी तुमच्या उपयोगी पडू शकेन असे वाटले नसेन परंतू आज तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली आहे"
असे म्हणून अधिक वेळ न दवडता त्या उंदराने आपल्या तीक्ष्ण दांतांनी ते जाळे कुरतडायला सुरवात केली. थोड्याच वेळात उंदराने कुरतडलेल्या जागेतून सिंह बाहेर पडला. बाहेर येवून मुक्त झालेल्या त्या वनराजाने कृतज्ञापुर्ण नजरेने उंदराकडे पाहिले आणि त्याला धन्यवाद दिले.
उपदेश : चांगुलपणाचे कुठलेही आणि कितीही छोटे काम कधीही व्यर्थ जात नाही.
❤❤HOPE IT HELP YOU ❤❤