| सुजय/सुजया. विद्यार्थी या नात्याने दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन करणारे पत्र लिहा. आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन
Answers
Answer:
दिनांक:२२जानेवारी २०२२
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
लायन्स रोटरी क्लब,
बोरिवली पश्चिम-४०००९५
विषय: पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल अभिनंदन
माननीय महोदय,
आपणास सांगण्यास खूप आनंद होत आहे कि काल तुम्ही आयोजित केलेल्या दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन खूप खूप आनंद झाला. पुस्तक हे मानवी आयुष्यातील खूप महत्त्वाचे साधन आहे. पुस्तकामुळे विचार प्रगल्भ होतात व नवनवीन गोष्टींची माहिती मिळते. तुम्ही आयोजित केलेल्या प्रदर्शनात खूपच दुर्मिळ अशी पुस्तकं पाहायला मिळाले.
मी आज पर्यंत भरपूर पुस्तकांच्या प्रदर्शनांना भेटी दिल्या आहेत. पण तुम्ही आयोजित केलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनात खूपच सुंदर आणि दुर्मिळ अशा पुस्तकांचा समावेश केल्यामुळे नवीन अशा पुस्तकांची ओळख झाली. मी माझ्या शाळेतील सर्व मित्रांना घेऊन उद्या पुन्हा तिथे भेट देणार आहे.
मला आशा आहे की भविष्यात देखील तुम्ही अशाच प्रकारचे पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करणार व आम्हा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्याची संधी देणार.
खूप खूप धन्यवाद व तुमचे अभिनंदन!
तुमचा कृपाभिलाषी,
राजेश,
विद्यार्थी, सरस्वती विद्यालय.
Explanation: